\n

भारताने विजयासाठी दिलेल्या 358 धावांचा पाठलाग करताना आपण जणू यंदाच्या आशिया करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्याचीच क्षणचित्रे पाहात आहोत असा भासही प्रेक्षकांना झाला असेल. त्यावेळी श्रीलंकेचा संपूर्ण संघ 50 धावांत गारद झाला होता, तर या स्पर्धेच्या गुरुवारी झालेल्या लढतीत त्यांचा संघ अवघ्या 55 धावांत तंबूत परतला. शमीने पाच, सिराजने 3 तर बुमराह व जडेजाने प्रत्येकी 1 गडी बाद केला.

\n

श्रीलंकेकडून कासुन रजिथाने सर्वाधिक 14 धावा केल्या. ऍजेलो मॅथ्युज व महिश तक्षिणा यांनी प्रत्येकी 12 धावा केल्या. त्यांच्या अन्य एकाही फलंदाजाला दोनअंकी धावाही करता आल्या नाहीत. त्यांच्या पाच फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. यामध्ये पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा , दुशान हेमंता आणि दुष्मंथा चमीरा यांचा समावेश आहे.

\n

#CWC23 #INDvSL : शुभमन-विराट-श्रेयसची शतके हुकली; भारतानं श्रीलंकेविरूध्द उभारली मोठी धावसंख्या…

\n

\n

तत्पूर्वी, श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियानं शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर यांची शानदार अर्धशतके आणि रविंद्र जडेजानं शेवटच्या षटकामध्ये केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर 50 षटकात 8 गडी गमावून 357 धावा केल्या.

\n

भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर कर्णधार रोहित शर्माला दिलशान मदुशंकाने क्लीन बोल्ड केले. त्याला चार धावा करता आल्या. यानंतर विराट कोहलीने शुभमन गिलसोबत दुसऱ्या विकेटसाठी 189 धावांची भागीदारी केली. मधुशंकाने ही भागीदारी तोडली. त्याने शुभमनला यष्टिरक्षक कुसल मेंडिसकडे झेलबाद केले. शुभमन 92 चेंडूत 92 धावा करून बाद झाला. आपल्या खेळीत त्याने 11 चौकार आणि 2 षटकार मारले.

\n

यानंतर विराटचे शतकही हुकले. मधुशंकाने त्याला निसांकाकरवी झेलबाद केले. विराटने 94 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने 88 धावांची खेळी केली. यानंतर श्रेयस अय्यर आणि केएल राहुलने 46 चेंडूत 60 धावांची शानदार भागीदारी केली. राहुल 19 चेंडूत 21 धावा करून बाद झाला. त्याला दुष्मंथा चमीराने बाद केले.सूर्यकुमार यादव काही विशेष करू शकला नाही. तो नऊ चेंडूत 12 धावा करून बाद झाला. दरम्यान, श्रेयसने एकदिवसीय कारकिर्दीतील 16 वे अर्धशतक झळकावले. त्याने 36 चेंडूत पन्नास धावा पूर्ण केल्या. मधुशंकाने श्रेयसला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तो 56 चेंडूंत तीन चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने 82 धावा करून बाद झाला.मोहम्मद शमी दोन धावा करून बाद झाला. त्याचवेळी रवींद्र जडेजाने 24 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 35 धावांची खेळी केली. भारतीय डावातील शेवटच्या चेंडूवर जडेजा धावबाद झाला.

\n

श्रीलंकेकडून मधुशंकाने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. त्यानं 10 षटकात 80 धावा दिल्या. तर चमीरा यानं 10 षटकात 71 धावा देताना एक विकेट घेतली. भारताचे दोन फलंदाज धावबाद झाले.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"#CWC23 #INDvSL : टीम इंडियाचा दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश; श्रीलंकेचा विक्रमी धावांनी केला पराभव …","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/11/bkks.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/cwc23-indvsl-indian-team-proudly-reached-the-semi-finals-defeated-sri-lanka-by-302-runs#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/11/bkks.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/cwc23-indvsl-indian-team-proudly-reached-the-semi-finals-defeated-sri-lanka-by-302-runs#webpage","name":"#CWC23 #INDvSL : टीम इंडियाचा दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश; श्रीलंकेचा विक्रमी धावांनी केला पराभव …","url":"https://www.dainikprabhat.com/cwc23-indvsl-indian-team-proudly-reached-the-semi-finals-defeated-sri-lanka-by-302-runs","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/cwc23-indvsl-indian-team-proudly-reached-the-semi-finals-defeated-sri-lanka-by-302-runs#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/11/bkks.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/cwc23-indvsl-indian-team-proudly-reached-the-semi-finals-defeated-sri-lanka-by-302-runs#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/cwc23-indvsl-indian-team-proudly-reached-the-semi-finals-defeated-sri-lanka-by-302-runs","name":"#CWC23 #INDvSL : टीम इंडियाचा दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश; श्रीलंकेचा विक्रमी धावांनी केला पराभव …"}}]}}}

#CWC23 #INDvSL : टीम इंडियाचा दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश; श्रीलंकेचा विक्रमी धावांनी केला पराभव …