Colombo Test Drawn : सोनल दिनुशाच्या खेळीने भारताची वाढवली डोकेदुखी! मालिका जिंकूनही WTC फायनलचा मार्ग झाला खडतर
Colombo Test Drawn : सोनल दिनुशाच्या नाबाद शतकामुळे कोलंबो कसोटी अनिर्णित राहिल्याने भारताच्या डब्ल्यूटीसी पॉइंटवर त्याचा परिणाम झाला आहे, ज्यामुळे फायनलची वाट अजून खडतर झाली आहे.

India Win Test Series Against Sri Lanka 1-0 Colombo Test Drawn WTC Points Table Impact : श्रीलंकेविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका भारतीय संघाने १-० अशा फरकाने जिंकली असली, तरी दुसऱ्या कसोटीत विजयाच्या उंबरठ्यावरून सामना अनिर्णित राहिल्यामुळे टीम इंडियाच्या पदरी काहीशी निराशा पडली आहे. पहिल्या डावात २१३ धावांची आघाडी घेत फॉलोऑन लादल्यानंतरही भारतीय गोलंदाजांना श्रीलंकेचा दुसरा डाव गुंडाळता आला नाही. पाचव्या दिवशी श्रीलंकन फलंदाजांनी केलेल्या जबरदस्त प्रतिकारामुळे हा सामना अनिर्णित संपला असून, याचा थेट फटका भारताच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) गुणतालिकेतील स्थानाला बसला आहे.
सोनल दिनुषा ठरला ‘संकटमोचक’; दोन्ही डावांत ठोकली शतकं!
भारताच्या ९ बाद ५०३ धावांच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेचा पहिला डाव २९० धावांवर संपला होता. फॉलोऑन मिळाल्यानंतर दुसऱ्या डावात श्रीलंकेचा युवा फलंदाज सोनल दिनुषाने अभूतपूर्व फलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने पहिल्या डावातील शतकानंतर (१०३) दुसऱ्या डावातही २६४ चेंडूंत नाबाद १३३ धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. श्रीलंकेने दुसऱ्या डावात ९ बाद ४२९ धावांवर डाव घोषित करून सामना अनिर्णित राखला. दिनुषा १९९७ नंतर भारताविरुद्ध दोन्ही डावांत शतके ठोकणारा श्रीलंकेचा पहिलाच फलंदाज ठरला.
भारताचा पीसीटी घसरला; गुणतालिकेत पाचव्या स्थानावरच मुक्काम!
Sri Lanka’s resilience with the bat ensures that only three wickets fall on the final day. The two teams shake hands after a hard-fought Test, which ends in a draw.#TeamIndia win the series 1-0.
Details – https://t.co/Uh4Xgn8rB5 pic.twitter.com/spxoqmBzct
— BCCI (@BCCI) August 27, 2026
कोलंबो कसोटीत विजय मिळाला असता तर भारताला १२ गुण मिळाले असते आणि त्यांचा पीसीटी (PCT) ६३.३३ टक्क्यांवर पोहोचून संघ चौथ्या क्रमांकावर विराजमान झाला असता. मात्र, सामना अनिर्णित राहिल्याने दोन्ही संघांना ४-४ गुण वाटून घ्यावे लागले. या निकालामुळे भारताचा पीसीटी ५३.३३ वरून थेट ५१.५१ टक्क्यांवर घसरला आहे. भारतीय संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी कायम आहे. तर श्रीलंका ३३.३३ टक्के गुणांसह सहाव्या स्थानी आहे. गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया ८०% गुणांसह अव्वल, तर दक्षिण आफ्रिका (७५%) दुसऱ्या स्थानी आहे.
डब्ल्यूटीसी फायनलची वाट खडतर; आता न्यूझीलंडविरुद्ध अग्निपरीक्षा –
EMOTIONAL MOMENT AT COLOMBO 🥹
– Sonal Dinusha & family celebrating the third hundred of the series, The hero of Sri Lanka. pic.twitter.com/HkI5V9qyr8
— Johns. (@CricCrazyJohns) August 27, 2026
या चालू डब्ल्यूटीसी २०२५-२७ चक्रात भारताला आता आणखी ७ कसोटी सामने खेळायचे आहेत. यामध्ये नोव्हेंबरमधील न्यूझीलंडविरुद्धचे दोन कसोटी सामने आणि त्यानंतर मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर मालिकेचा समावेश आहे. फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी भारतीय संघाला आगामी सर्व मालिकांमध्ये विजयाची मालिका कायम राखावी लागणार आहे.





