IPL 2024 (RCB vs CSK Match 68) : चेन्नई-बेंगळुरू सामन्यात पाऊस ठरणार का खलनायक? हवामान खात्याचा अहवाल आला समोर…

IPL 2024 (RCB vs CSK Match 68, Weather Update) : आयपीएल 2024 च्या 68 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे संघ एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आमनेसामने येतील. हा सामना भारतीय वेळेनुसार शनिवार, 18 मे रोजी संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल.
वास्तविक, चेन्नई सुपर किंग्ज जिंकण्यात यशस्वी ठरल्यास ते प्लेऑफमध्ये पोहोचेल. त्याचवेळी चेन्नईविरुद्ध पाठलाग करताना RCBने 18.1 षटकांत किंवा त्याआधी लक्ष्य गाठले किंवा प्रथम खेळताना 18 किंवा त्याहून अधिक धावांनी विजय मिळवला तरच फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ ठरेल. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे.
शनिवारी बंगळुरूमध्ये पावसाची शक्यता?
यापूर्वी सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्याचवेळी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यातही पाऊस खलनायक ठरला. त्यानंतर एकही चेंडू न टाकता सामना रद्द करावा लागला. आता प्रश्न असा आहे की चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यात पाऊस खलनायक ठरणार का? चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर सामना पावसामुळे वाहून जाईल का? तसेच शनिवारी बेंगळुरूमधील हवामानाचा अंदाज कसा असेल? खरं तर, क्रिकेट चाहत्यांसाठी याबाबत चांगली बातमी नाही.
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यात पाऊस खलनायक ठरू शकतो. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, ढगाळ वातावरण राहिल आणि पावसाची शक्यता असेल. तसेच जोरदार वादळासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार, शनिवारी बेंगळुरूमध्ये पावसाची शक्यता 75 टक्के आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर सामना पावसामुळे रद्द झाला तर त्याचा फायदा रुतुराज गायकवाडच्या संघाला मिळेल. वास्तविक, सामना रद्द झाल्यानंतर दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण मिळतील, त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचे 15 गुण होतील. अशा प्रकारे ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफमध्ये पोहोचेल, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा प्रवास संपेल.





