J&K Elections 2024 : ‘या घराण्यांनी भ्रष्टाचाराचा…’; शाहपूरकंडी प्रकल्पाचा उल्लेख करत नड्डा यांनी काँग्रेसला धरले धारेवर

Shahpurkandi dam project : जम्मू-काश्मीरमधील बर्नईमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी शाहपूरकंडी प्रकल्पाचा उल्लेख करत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. निवडणूक रॅलीला संबोधित करताना नड्डा म्हणाले की, ‘यूपीए सरकारने पाकिस्तानचा राग येईल या भीतीने शाहपूरकंडी प्रकल्पाला हात लावला नाही. पाणी आमचे आहे, क्षेत्र आमचे आहे, धरण आमचे आहे आणि पाकिस्तानच्या नाराजीची त्यांना चिंता होती’. असं ते यावेळी म्हणाले.
नड्डा पुढे म्हणाले की, आज शाहपूरकंडी प्रकल्पाचे काम सुरू असून जम्मूच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचवण्याचे काम पूर्ण केले जाईल. हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल, असे नड्डा म्हणाले की, अब्दुल्ला कुटुंब, मुफ्ती कुटुंब आणि नेहरू-गांधी कुटुंबाने काश्मीरचे नुकसान केले. या घराण्यांनी भ्रष्टाचाराचा पेच निर्माण करून भ्रष्टाचार केला. 1990 चे दिवस पुन्हा यावेत अशी त्यांची इच्छा आहे.
NC-काँग्रेस पाकिस्तानी अजेंडा चालवत आहेत :
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले की, ते म्हणतात की आम्ही एलओसीमध्ये पुन्हा व्यवसाय सुरू करू. व्यापाराच्या नावाखाली एलओसीवरून दहशतवाद येत होता हे तुम्हाला माहीत आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी प्रमाणपत्र दिले आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री म्हणतात की नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस भारतात आमचा अजेंडा चालवत आहेत.
नड्डा म्हणाले की, पीएम-किसान अंतर्गत शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची वार्षिक आर्थिक मदत 10,000 रुपये केली जाईल. पंडित प्रेमनाथ डोगरा योजनेंतर्गत आम्ही 5 लाख तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करणार आहोत. भूमिहीनांना अटल आवास योजनेंतर्गत 5 मरला जमीन मोफत दिली जाणार आहे. आमच्या मंदिरांच्या पुनर्बांधणीसाठी आणि पुनरुज्जीवनासाठी आर्थिक मदत केली जाईल. असं देखील नड्डा यावेळी म्हणाले.
शाहपूरकंडी प्रकल्प म्हणजे काय?
शाहपूरकंडी धरण प्रकल्प भारताच्या पंजाब राज्यातील पठाणकोट जिल्ह्यातील रावी नदीवर आहे. शाहपूरकंडी धरणाच्या उभारणीसाठी पंजाब आणि जम्मू-काश्मीर यांच्यात जानेवारी 1979 मध्ये द्विपक्षीय करार झाला, पण प्रस्तावित प्रकल्प प्रत्यक्षात आला नाही. या प्रकल्पाची पायाभरणी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सन 1982 मध्ये केली होती मात्र यूपीए सरकारच्या काळात हे धरण बांधता आले नाही. या धरणाचे काम मोदी सरकारच्या काळात (2018) सुरू झाले आणि आता ते पूर्ण झाले आहे.





