शेतकऱ्यांना विश्‍वासात घेऊनच विमानतळाचे निर्माण

जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे आश्‍वासन

नायगाव- पुरंदर विमानतळाला सर्व प्रकारच्या मंजुऱ्या मिळालेल्या आहेत. विमानतळाचे काम 95 टक्‍के झाले आहे. विमानतळ विकासाचे सर्वात मोठे महाद्वार आहे. विमानतळाबाबत शेतकऱ्यांना विश्‍वासात घेऊन काम केले जाईल. शेतकऱ्यांचे एक इंचाचेही नुकसान होणार नाही, असे आश्‍वासन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिले.

नायगाव (ता. पुरंदर) येथे एका कार्यक्रमप्रसंगी विजय शिवतारे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य दिलीप यादव, सभापती रमेश जाधव, सदाशिव चौंडकर, किशोर खळदकर, चंद्रकांत कड, चंद्रकांत चौंडकर, आशा खळदकर, युवासेनेचे तालुकाध्यक्ष उमेश गायकवाड, सरपंच दिपाली जगताप, माणिक निंबाळकर, राजेंद्र गद्रे, दादा मारणे, गणेश कोलते, मंगल मेमाणे, दादा खेसे, यशवंत कड, काशिनाथ खळदकर, म्हलारी कड, संजय होले, ज्ञानेश्‍वर सोनवणे, प्रविण जगताप, नारायण चौंडकर, महेंद्र खेसे, रायचंद खेसे, संजय चौंडकर, दीपक चौंडकर आदी उपस्थित होते.

शिवतारे म्हणाले की, कॉंग्रेस-राष्ट्रवादीने 60 वर्षांत जेवढा निधी आणला नाही तेवढा निधी मी पाच वर्षांत आणला. 27 डिसेंबर 1997 ला शिवसेना-भाजपची सत्ता असताना पुरंदर उपसासिंचन योजनेला मान्यता मिळाली. या योजनाचे पुढील 100 ते 200 वर्षे 81 टक्‍के बिल शासन भरणार आहे. शेतकऱ्यांना 19 टक्‍के बिल भरावे लागेल, असा कायदा करून ठेवला आहे. जनाई शिरसाई योजना बंद पाइपलाइनद्वारे केली जाईल. पुरंदरमध्ये 63 कोटींचे 429 सिमेंट बंधारे झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)