महिला आरक्षण बिलाचे क्रेडिट काँग्रेस घेऊ पाहतेय – भाजप खासदार निशिकांत दुबे

Women Reservation Bill Live : लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे नारी शक्ती वंदन २०२३ हे विधेयक काल लोकसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. दरम्यान, आज काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पहिल्यांदाच नव्या संसदेत भाषण केले. यावेळी त्यांनी महिला आरक्षण विधेयकाबाबत त्यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी विधेयकाच्या मंजुरीने खऱ्या अर्थाने राजीव गांधी यांचे स्वप्न पूर्ण होईल असे वक्तव्य केले.
यानंतर केंद्र सरकारकडून भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला. भाषणा दरम्यान काँग्रेसवर गंभीर आरोप लावले. काँग्रेसने हे बिल लटकून ठेवले. काँग्रेस राजकारण करत होती असेही दुबे म्हणाले. काँग्रेस पक्ष लोकशाहीचा गळा दाबते आहे. या बिलाचे पास होताच अनेक स्त्रीयांचे प्रश्न सुटतील. आरक्षावरून राजकारण करणे खूपच दुर्भाग्य पूर्ण आहे. दुबे पुढे म्हणाले, हे भाजप पक्षाचे आणि पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचे बिल आहे. काँग्रेस पक्ष याचे सर्व क्रेडिट घेऊ पाहते आहे.’
दरम्यान, भाजप खासदार निशिकांत दुबे म्हणाले, मणिपूरच्या विषयावर चर्चा झाली. मी अविश्वास प्रस्तावाचा विरोध करतो. मात्र, दुबे बोलत असताना विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. बहुचर्चित महिला आरक्षण विधेयक आज बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लोकसभेत सादर करण्यात आले. त्या विधेयकाचा मसुदा नेमका काय आहे, या विषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. त्यामुळे आज सकाळपर्यंत त्या विषयीची संदिग्धता कायम राहिली होती. पण प्रत्यक्षात जेव्हा या विधेयकाचा मसुदा हाती आला त्यानंतर बऱ्याच बाबींवर प्रकाश पडू शकला आहे. यातील एक महत्त्वाची बाब अशी की, हे महिला आरक्षण आगामी लोकसभा निवडणुकीत लागू होणार नाही. हे आरक्षण त्या पुढच्या म्हणजे सन 2029 च्या लोकसभा निवडणुकीतच लागू होणार आहे. त्यामुळे या विषयाच्या आनंदावर विरजणच पडले आहे.





