सायबर हल्ल्यामुळे कंपन्यांचे नुकसान
Updated On:
नवी दिल्ली – जुलै 2018 ते एप्रिल 2019 या कालावधीत भारतातील विविध कंपन्यांनी संस्थांवर झालेल्या सायबर हल्ल्यामुळे 12.8 कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे आयबीएम या संस्थेने जारी केलेल्या अभ्यास अहवालात म्हटले आहे.
इतर देशातही असे प्रकार घडत आहेत. पूर्वीपेक्षा आताचे सायबर हल्ले अधिक संघटित झाल्याचे दिसून येते. त्यामुळे कंपन्यांनी अधिक सावध राहण्याची गरज असल्याचे आयबीएम कंपनीच्या सुरक्षा विभागाचे अधिकारी वैद्यनाथन यांनी सांगितले.
टॅग्स:





