‘बाहों में चली आओ…’; गाण्यावर भाग्यश्रीचा मनमोहक डान्स पाहून चाहते घायाळ, व्हिडीओ व्हायरल

Bhagyashree : सिनेसृष्टीतील कलाकार त्यांच्या सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. कलाकारांचे इंन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात रील व्हायरल होत असतात. बॅालीवूड इंडस्ट्रीत मैने प्यार किया या चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री भाग्यश्री सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.
अभिनेत्री भाग्यश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘बाहों में चली‘ या गाण्यावरचा एक रोमँटिक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओतील तिच्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. पांढऱ्या रंगाची शिमरी साडी तिने परिधान केली असून, तिच्या मनमोहक अदांनी सर्वांनाच घायाळ केले आहे. महत्वाची बाब म्हणजे भाग्यश्रीचे वय ५६ असून देखील ती आजही तरुण दिसते.
View this post on Instagram
व्हिडीओमध्ये तिच्या चेहऱ्यावरील गोड हास्य आणि साडीतील तिचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते चकित झाले आहेत. तिने स्वतःला इतके फिट आणि तरुण कसे ठेवले आहे, याबद्दलही चाहते तिची प्रशंसा करत आहेत. भाग्यश्रीचा पहिला चित्रपट सुपरहिट ठरल्यानतर तिने अनेक हिंदी, तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण काही वर्ष भाग्यश्री चित्रपटसृष्टीपासून दूर गेली होती. ती राधे श्याम चित्रपटातही दिसली होती. त्यामुळे आता भाग्यश्री आगामी कोणत्या चित्रपटात दिसणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
हेही वाचा : ‘काँग्रेसचे अनेक सोशल मीडिया अकाउंट परदेशातून चालतात” ; संबित पात्रा यांचा गंभीर आरोप





