शोभिताच्या नाग चैतन्याला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; दोघांचा रोमँटिक फोटो सोशल मीडियावर केला शेअर

Sobhita Dhulipala : दाक्षिणात्य अभिनेत्री शोभिता धुलिपालाने तिचा पती नागा चैतन्यला त्याच्या ३९ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने खास पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या. शोभिताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दोघांचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोला शोभिताने खास प्रकारचे कॅप्शन दिले आहे.
शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य हे दक्षिणेतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. या फोटोत दोघेही एकमेकांसोबत खूप आनंदी दिसत आहेत. शोभिता हिने तिचा पती नाग चैतन्यचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इंस्टाग्रामवर शेअर केलेला गोड फोटोला त्यांच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
या फोटोमध्ये नागा चैतन्य शोभिताला थंडीपासून वाचवण्यासाठी तिच्या स्वेटरची चैन लावताना दिसत आहे. तिने या पोस्टला ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रियकर @chayakkineni. असे कॅप्शन दिले आहे. नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाचे लग्न ४ डिसेंबर २०२४ रोजी हैदराबादमधील अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये पारंपारिक पद्धतीने झाले. त्यांच्या लग्नसोहळ्याला दोघांच्या कुटुंबातील नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते.
नागा चैतन्य शेवटचा ‘थांडेल’ चित्रपटात दिसला होता. तो आता ‘वृषकर्मा’ नावाच्या बहुप्रतिक्षित चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट सुकुमार यांनी लिहिला असून, कार्तिक दंडू यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच शेअर करण्यात आले होते.
हेही वाचा : शिंदे-फडणवीसांतील दुराव्यापासून ते अमेरिकेच्या टॅरीफपर्यंतच्या टॉप १० बातम्या वाचा एका क्लिकवर





