Sambit Patra on Congress। भाजप खासदार संबित पात्रा यांनी ,”काँग्रेस पक्ष देशाबाहेरील व्यक्तींशी संगनमत करत भारताविरुद्ध एक दृष्टिकोन तयार करण्यासाठी आहे. ” असा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी हा आरोप करताना, सोशल मीडियाच्या फीचर्सवरून असे दिसून आलंय कि अनेक काँग्रेस नेत्यांचे आणि संघटनात्मक खात्यांचे स्थान भारतात नाही तर परदेशात आहे.” असे म्हटले आहे. पात्रा यांनी याविषयी बोलताना,”पवन खेरा यांचे खाते अमेरिकेत असल्याचे दिसते, तर महाराष्ट्र काँग्रेसचे खाते आयर्लंडशी जोडले गेले होते, परंतु नंतर ते भारतात बदलण्यात आले. हिमाचल काँग्रेसचे खाते थायलंडशी जोडले गेले असल्याचे सांगितले जात होते.” अशी धक्कादायक माहिती दिली. पत्रकार परिषदेत संबित पात्रा यांनी, २०१४ मध्ये भाजप सत्तेत आल्यापासून काँग्रेस, राहुल गांधी आणि डाव्या पक्षांमधील प्रमुख व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचा अपमान करण्यात कोणतीही कसर सोडली नाही.असे म्हणत काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांवर टीका केली. संबित पात्रा यांचा काय दावा? Sambit Patra on Congress। संबित पात्रा यांनी दावा केला की अनेक डाव्या विचारसरणीचे आणि काँग्रेस समर्थक प्रभावशाली व्यक्ती पाकिस्तान, बांगलादेश आणि आग्नेय आशियामध्ये आहेत आणि ते भारताविरुद्ध अजेंडा राबवत आहेत. ते म्हणाले, “काँग्रेसचे ध्येय देशाचे विभाजन करणे आहे आणि म्हणूनच, ते भारताविरुद्ध वातावरण निर्माण करण्यासाठी परदेशी देशांशी संगनमत करत आहे.” ते म्हणाले की अनेक परदेशी अकाउंट भारताच्या संवैधानिक संस्थांची बदनामी करत आहेत आणि निवडणूक आयोगाबद्दल आक्षेपार्ह टिप्पण्या करत आहेत. परदेशी व्यासपीठांवरून भारतविरोधी दृष्टिकोन Sambit Patra on Congress। भाजप खासदाराने आरोप केला की,”परदेशी व्यासपीठांवरून तीन प्रकारचे कथा मांडले जात आहेत: पहिले, मत चोरी, दुसरे, पंतप्रधान नरेंद्र मोदींना कमकुवत करण्याचा प्रयत्न, म्हणजेच ऑपरेशन सिंदूर आणि तिसरे, आरएसएस आणि मोदींविरुद्ध सतत हल्ले”. ते म्हणाले की हा एक संघटित कट आहे आणि देशाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच “अर्पित शर्मा यांच्या एका अकाउंटने मत चोरीबद्दल लिहिले आहे आणि संवैधानिक संस्थेला बदनाम करण्याचे काम केले आहे. हे अकाउंट युरोपमध्ये आहे. सिंगापूरमध्ये असलेल्या दुसऱ्या अकाउंटने निवडणूक आयोगाविरुद्ध आक्षेपार्ह ट्विट पोस्ट केले आहेत.” असे त्यांनी यावेळी सांगितले.