WTA Finals : कोको गॉफची उपांत्य फेरीत धडक, अव्वल मानांकित स्विटेकवर केली मात….

रियाध –अमेरिकन टेनिसपटू कोको गॉफने धडाकेबाज कामगिरी करताना मोसमातील अंतिम स्पर्धेत डब्ल्यूटीए फायनलमध्ये (WTA Finals) अव्वल मानांकित पोलंडच्या इगा स्विटेकवर 6-3, 6-4 असा विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली आहे. या निकालाचा अर्थ असा आहे की पाच वेळची ग्रँड स्लॅम चॅम्पियन स्विटेक या आठवड्यात क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरून पुढे जाऊ शकणार नाही आणि आर्यना सबलेका प्रथमच अव्वल स्थानावर वर्षाचा शेवट करेल.
सप्टेंबर 2023 मध्ये आर्यना सबालेन्काने पोलंडच्या इगा स्विटेकला क्रमवारीत मागे टाकले होते. मात्र त्यानंतर डब्ल्यूटीएची अंतिम फेरी जिंकून स्विटेकने पुन्हा अव्वल स्थान जिंकले होते.
Chennai Grand Masters 2024 : पहिल्या फेरीत एरिगेसीची गुजरातीवर मात…
मंगळवारी उशीरा झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये कोको गॉफने स्विटेकचे आव्हान संपुष्टात आणल्याचा सर्वाधिक फायदा सबालेन्काला झाला आहे. त्यामुळे चालू वर्षाच्या अखेरीस बेलारूसची सबालेन्का ही महिला क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान होणार आहे. सबालेन्काने यापूर्वी 2018,2021 व 2022 मध्ये महिला दुहेरीत अव्वल स्थान मिळविले होते.





