Chennai Grand Masters 2024 : पहिल्या फेरीत एरिगेसीची गुजरातीवर मात…

Chennai Grand Masters 2024 :- जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या अर्जुन एरिगेसीने चेन्नई बुद्धिबळ ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्या फेरीत विदित गुजरातीवर (Arjun Erigaisi vs Vidit Gujrathi) पाच तासांत मात केली. एरिगेसीला ऐतिहासिक 2800 इएलओ रेटिंग प्राप्त केल्यानंतर तो प्रथमच भारतात खेळत होता. विदित गुजरातीने या लढतीत एरिगेसीला कडवी झुंज दिली.
हे दोन्ही ग्रँडमास्टर नुकत्याच झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होते. जागतिक क्रमवारीत 29 व्या स्थानी असलेल्या अरविंद चिदंबरमने इराणचा ग्रँडमास्टर अमीन तबाताबेईला एका खडतर सामन्यात बरोबरीत रोखले.
अमेरिकेचा लेव्हॉन अरोनियन आणि सर्बियाचा ॲलेक्सी सेरेना यांच्यातील सामनाही अनिर्णित राहिला. अरोनियन हा स्पर्धेतील दुसरा मानांकित खेळाडू आहे. काळ्या सोंगट्यांसह खेळणाऱ्या मॅक्सिम वॅचियर लॅग्रेव्हने परहम माघसौदलाउचा पराभव करून स्पर्धेतील अव्वल स्थान गाठले.
IND vs PAK : …तर भारताचा विराट कोहली अन् पाकचा बाबर एकाच टीमकडून खेळताना दिसतील
चॅलेंजर प्रकारात 18 वर्षीय रौनक साधवानीने कार्तिकेयन मुरलीला तर लिओन मेंडोन्काने आर. वैशिलचा पराभव केला. व्ही प्रणवने हरिका द्रोणवल्लीवर विजय नोंदवला. अभिमन्यू पुराणिकने एम प्रणेशचा पराभव केला.





