Cockroach Janata Party : कॉक्रोच जनता पार्टीचे X हँडल बंद; भाजपला मागे टाकून लाखो फॉलोअर्स होताच कारवाई?
Cockroach Janata Party : भीती व्यक्त करताच तासाभरातच एक्स अकाऊंटवर कारवाई

Cockroach Janata Party : भारताच्या सरन्यायाधीशांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’चे ‘एक्स’ अकाउंट बंद करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर या पक्षाची जोरदार चर्चा सुरू आहे.
अवघ्या ६ दिवसांत भारतीय जनता पक्षालाही मागे टाकून लाखो फॉलोअर्स कमावणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या X हँडलवर कारवाई करण्यात आली आहे. आता ते थेट बंद करण्यात आलं आहे. (Cockroach Janata Party)
View this post on Instagram
विशेष म्हणजे अवघ्या तासाभरापूर्वीच या सोशल गटाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आपले सोशल हँडल बॅन होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली होती. त्यानंतर थेट एक्स अकाऊंट बंद करण्यात आले. अकाऊंट बंद झाल्यानंतर अभिजित दिपके यांनी संताप व्यक्त केला.
Rupali Bhosle: राखाडी कॉटन साडीत रुपाली भोसलेचा सोज्वळ अंदाज; चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
ज्याची भीती होती तेच झालं (Cockroach Janata Party)
ते म्हणाले की, “ज्याची भीती होती तेच झालं. आधी त्यांनी आमचं अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न केला. पण ते शक्य झालं नाही तर त्यांनी भारतात कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बॅन केलं आहे. आम्ही काही चुकीचं बोललो नव्हतो. आम्ही फक्त मंत्र्यांचा राजीनामा मागत होतो. विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्याची जबाबदारी निश्चित व्हावी अशी आमची मागणी होती. त्यावर त्यांनी आमचं अकाऊंटच बंद केलं. ही कुठली लोकशाही आहे?” (Cockroach Janata Party)
काही वेळापूर्वीच अभिजीत दीपके यांनी अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही केला होता. त्यानंतर तासाभरातच त्यांच्या एक्स अकाऊंटवर कारवाई करण्यात आली आहे.
अवघ्या ६ दिवसांत या ‘कॉकरोच जनता पार्टी’चे ११.३ मिलियनपेक्षा (१ कोटी १३ लाखांहून) जास्त फॉलोअर्स झाले आहेत. या पार्टीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पार्टीच्या ८.७ मिलियन फॉलोअर्सच्या संख्येलाही मागे टाकले आहे.
हेही वाचा:
Gold-Silver Price Today: लागोपाठ चौथ्या दिवशी सोन्याची चकाकी वाढली ; तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ





