Rupali Bhosle: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका लपंडाव सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेतील रंजक कथानक आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे ही मालिका चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच मालिकेने २०० भागांचा टप्पा पूर्ण केला असून संपूर्ण टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. Rupali Bhosle Cotton Saree Look रुपाली भोसलेने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती अतिशय साध्या पण आकर्षक लूकमध्ये दिसत आहे. राखाडी रंगाची कॉटन साडी आणि त्यावर खणाचा ब्लाऊज असा तिचा पारंपरिक अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे. (Rupali Bhosle) Rupali Bhosle Cotton Saree Look साधेपणातही सौंदर्य कसं खुलू शकतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे रुपालीचा हा लूक असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. तिने हलका मेकअप, मोकळे केस आणि साधे दागिने परिधान करून हा लूक पूर्ण केला आहे. हातात फूल घेऊन दिलेल्या विविध पोजमुळे तिच्या फोटोंमध्ये आणखीच मोहकपणा दिसून येत आहे. Rupali Bhosle Cotton Saree Look रुपालीच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “खूप सुंदर”, “सोज्वळ आणि मोहक”, “मराठमोळा अंदाज भारी” अशा कमेंट्स सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. अनेक चाहत्यांनी तिच्या पारंपरिक लूकचं विशेष कौतुक केलं आहे. Rupali Bhosle Cotton Saree Look दरम्यान, ‘लपंडाव’ मालिकेचं कथानक सध्या महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचलं आहे. मालिकेत पुढे काय घडणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. Rupali Bhosle Cotton Saree Look रुपाली भोसले ही मराठी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तिच्या अभिनयासोबतच तिच्या फॅशन आणि स्टाइललाही चाहत्यांची मोठी पसंती मिळत असते. सोशल मीडियावर ती नेहमीच सक्रिय असते आणि चाहत्यांसोबत फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. Rupali Bhosle Cotton Saree Look रुपालीच्या या नव्या पारंपरिक लूकने पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांची मनं जिंकली आहेत. साधेपणातही आकर्षक दिसणारा तिचा हा अंदाज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.