Gunaratna Sadavarte : सदावर्तेंना बाजूला ठेवत भाजपकडून नव्या एसटी कामगार संघटनेची स्थापना
राज्यात एसटी कर्मचारी श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्य नावाने भाजपाच्या नव्या एसटी कर्मचारी संघटनेची स्थापना झाली आहे. ॲड. गुणरत्न सदावर्तेंना (Gunaratna Sadavarte) बाजूला ठेवत भाजपाची ही नवी संघटना केली आहे.

Gunaratna Sadavarte : राज्यात एसटी कर्मचारी श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्य नावाने भाजपाच्या नव्या एसटी कर्मचारी संघटनेची स्थापना झाली आहे. ॲड. गुणरत्न सदावर्तेंना (Gunaratna Sadavarte) बाजूला ठेवत भाजपाची ही नवी संघटना केली आहे.
या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय मालोकार हे आहेत. सदावर्तेंना बाजूला ठेवत नवी संघटना स्थापन केल्याने चर्चांना उधाण आले आहे.एसटी कामगारांच्या प्रश्नांवर आता भाजपचीही स्वतंत्र संघटनात्मक (Gunaratna Sadavarte) एन्ट्री झाली आहे.
ही संघटना श्रम भारतीय जनता कामगार महासंघाशी संलग्नित आहे. आतापर्यंत सदावर्ते यांची एसटी कर्मचारी संघटना भाजपची संघटना समजली जायची. मात्र भाजपने सदावर्तेना बाजूला ठेवत स्वतःची नवी संघटना स्थापन केली. अकोल्यात या संघटनेची पहिली बैठक पार पडली.
या बैठकीला भाजपचे विधानसभेतील मुख्य प्रतोद आमदार रणधीर सावरकर आणि आमदार वसंत खंडेलवाल उपस्थित होते. एसटी कामगारांच्या आतापर्यंतच्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रणित संघटनेची ही (Gunaratna Sadavarte) स्थापना महत्त्वाची मानली जात आहे. एसटी महामंडळाला गतवैभव मिळवून देण्यासाठी आणि कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी या संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे आमदार रणधीर सावरकर यांनी स्पष्ट केले.






