Gold-Silver Price Today: आखाती देशातील युद्धाचा परिणाम आणि देशात सुरु असणाऱ्या लग्नसराईचा परिणाम आज सोन्याचा किमतींवर दिसून आला. सलग तीन दिवसांपासून सोन्याचे दर वाढत आहेत. आजदेखील सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. ऐन लग्नसराईत सोन्याचे दर वाढत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र फटका बसत आहे. आज सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे जवळपास ५०० रुपयांची वाढ झाली आहे. आजचे सोन्याचे दर Gold-Silver Price Today: आज २४ कॅरेट सोन्याचे दर ४९० रुपयांनी महागले आहेत. याची किंमत १,५९,९३० रुपये झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ३९२ रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,२७,९४४ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ४,९०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १५,९९,३०० रुपये झाले आहेत. Gold-Silver Price Today: २२ कॅरेटचे दर (२२ कॅरेट) आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ४५० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर १,४६,६०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ३६० रुपयांनी वाढले असून हे दर १,१७,२८० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ४,५०० रुपयांनी वाढले असून हे दर १४,६६,००० रुपये झाले आहेत. १८ कॅरेट सोन्याचे दर (१८ कॅरेट) Gold-Silver Price Today: १८ कॅरेट सोन्याचे दर १ तोळ्यामागे ३७० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,१९,९५० रुपये झाले आहे. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर २९६ रुपयांनी वाढले असून हे दर ९५,९६० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोनं ३,७०० रुपयांनी वाढले असून हे दर ११,९९,५०० रुपये झाले आहेत.