CM Suvendu Adhikari Oath Ceremony: पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदा सत्तेवर आलेल्या भाजप सरकारचा आज शपथग्रहण सोहळा पार पडत आहे. नुकतेच सुवेंदू अधिकारी यांनी ब्रिगेड परेड ग्राऊंडवर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. भव्य सोहळ्यात राज्यपाल आर. एन. रवि यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील दिग्गज नेते उपस्थित होते. ( CM Suvendu Adhikari Oath Ceremony) शुभेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे 9 वे मुख्यमंत्री बनले आहेत. काल अमित शाह यांच्या उपस्थितीत त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली होती. बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपचे सरकार स्थापन झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. Mothers Day: मदर्स डे ला आईला द्या आरोग्याची खास भेट! ‘हे’ हेल्दी गिफ्ट्स आणतील तिच्या चेहऱ्यावर आनंद या विधानसभा निवडणुकीत भाजपने 293 पैकी 207 जागांवर प्रचंड विजय मिळवून पूर्ण बहुमत प्राप्त केले आहे. तर 15 वर्षे सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला केवळ 80 जागांवर समाधान मानावे लागले. स्वतः शुभेंदू अधिकारी यांनी भवानीपूर मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा पराभव करत ‘जायंट किलर’ ठरले होते. ममतांची 15 वर्षांची सत्ता उलथवून मिळवलं यश (CM Suvendu Adhikari Oath Ceremony) सुवेंदू अधिकारी यांच्या आजच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन उपस्थित आहेत. त्याशिवाय एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री सुद्धा आले आहेत. 294 सदस्यांच्या पश्चिम बंगालमध्ये भाजपने तब्बत 207 जागांवर विजय मिळवला. म्हणजे भाजपकडे जवळपास दोन तृतीयांश जागा आहेत. ममता बॅनर्जी यांची 15 वर्षांची सत्ता उलथवून भाजपने हे यश मिळवलं आहे. (CM Suvendu Adhikari Oath Ceremony) Apple: अमेरिकेत १४ दिवसांत रिटर्न, पण भारतात ‘नो रिफंड’; अॅपलच्या नियमांवर ग्राहक नाराज सुवेंदू अधिकारी यांचा प्रवास (CM Suvendu Adhikari Oath Ceremony) सुवेंदू अधिकारी यांचा राजकीय प्रवास अत्यंत रंजक राहिला आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात तळागाळातील काँग्रेस कार्यकर्ता म्हणून केली होती. पुढे त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पक्षाच्या अत्यंत प्रभावशाली नेत्यांमध्ये त्यांची गणना होऊ लागली. ग्रामीण बंगालमध्ये तृणमूलचा विस्तार करण्यात त्यांची मोठी भूमिका मानली जात होती. मात्र, २०२० मध्ये ममता बॅनर्जी यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि अल्पावधीतच ते बंगाल भाजपचा सर्वात मोठा चेहरा बनले. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी नंदीग्राम मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा पराभव करून संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर २०२६ च्या निवडणुकीत त्यांनी दुसऱ्यांदा ममता बॅनर्जी यांचा पराभव केला आहे. हेही वाचा: India : एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे सीडीएस, तर कृष्णा स्वामीनाथन यांच्याकडे नौदलाची धुरा; जाणून घ्या कोण आहेत हे दोन अधिकारी