India : एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे सीडीएस, तर कृष्णा स्वामीनाथन यांच्याकडे नौदलाची धुरा; जाणून घ्या कोण आहेत हे दोन अधिकारी
India: वाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांची नौदलाचे प्रमुख (Chief of Naval Staff) म्हणून नियुक्ती करण्यात आली.

India : भारत सरकारने लेफ्टनंट जनरल एन.एस. राजा सुब्रमणी यांची नवे ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ म्हणून नियुक्ती केली आहे. पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून ते पुढील आदेशापर्यंत भारत सरकारच्या सैन्य व्यवहार विभागात सचिव म्हणूनही काम पाहतील. वर्तमान चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, जनरल अनिल चौहान ३० मे २०२६ रोजी आपला कार्यकाळ पूर्ण करत आहेत.
लेफ्टनंट जनरल एन.एस. राजा सुब्रमणी १ सप्टेंबर २०२५ पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी, त्यांनी १ जुलै २०२४ ते ३१ जुलै २०२५ या काळात लष्कराचे उपप्रमुख आणि मार्च २०२३ ते जून २०२४ या काळात मध्य कमानचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
Sanjeev Arora : कॅबिनेट मंत्री संजीव अरोरा यांच्या घरावर ईडीची धाड; पंजाबच्या राजकारणात खळबळ
लेफ्टनंट जनरल एन.एस. राजा सुब्रमणी कोण आहेत? (India)
एन.एस. राजा सुब्रमणी यांचा गौरवशाली प्रवास नॅशनल डिफेन्स अकॅडमीतून (NDA) सुरू झाला. डिसेंबर १९८५ मध्ये त्यांना ‘द गढवाल रायफल्स’मध्ये कमिशन मिळाले. अभ्यासातील उत्तम कामगिरीमुळे त्यांनी लंडनच्या किंग्स कॉलेजमधून मास्टर ऑफ आर्ट्स आणि मद्रास विद्यापीठातून डिफेन्स स्टडीजमध्ये एम.फील. (M.Phil.) पदवी संपादन केली आहे.
आपल्या कारकिर्दीत त्यांनी विविध ऑपरेशन आणि भौगोलिक क्षेत्रांत कमांड, स्टाफ आणि ट्रेनिंगशी संबंधित अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. विशेषतः पश्चिम आणि उत्तर सीमांशी संबंधित धोरणात्मक आणि त्यांच्या सखोल कामगिरीमुळे राष्ट्रीय सुरक्षेत मोठे योगदान मिळाले आहे.
त्यांच्या अतुलनीय सेवेबद्दल त्यांना परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, सेना पदक आणि विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान, नौदल, एअरफोर्स आणि लष्कर या तिन्ही सैन्य दलांमध्ये उत्तम समन्वय रहावा यासाठी केंद्र सरकारने सीडीएस या पदाची निर्मिती केली आहे. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी तिन्ही सैन्य दलांमध्ये सीडीएसमुळे उत्तम समन्वय राखता आला.
वाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन कोण आहेत? (India)
दुसरीकडे, वाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांची नौदलाचे प्रमुख (Chief of Naval Staff) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या मुंबईत पश्चिम नौदल कमानचे कमांडर असून ३१ मे रोजी आपला पदभार स्वीकारतील. त्यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२८ पर्यंत असेल.
इलेक्ट्रॉनिक्स युद्धपद्धतीत कुशल असलेले अॅडमिरल स्वामिनाथन यांनी कोची विद्यापीठातून विज्ञान व तंत्रज्ञान विषयात स्नातकोत्तर विज्ञान (एमएस्सी), लंडनच्या किंग्स कॉलेजमधून संरक्षण अभ्यास विषयात एमए, मुंबई विद्यापीठातून सामरिक अभ्यासात एमफिल व आंतरराष्ट्रीय अभ्यासात मुंबई विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली आहे.
वाईस ॲडमिरल स्वामीनाथन १ जुलै १९८७ रोजी भारतीय नौदलात दाखल झाले होते. त्यांनी नॅशनल डिफेन्स अकॅडमी, जॉइंट सर्व्हिसेस कमांड अँड स्टाफ कॉलेज (युनायटेड किंगडम), कॉलेज ऑफ नेव्हल वॉरफेअर आणि युनायटेड स्टेट्स नेव्हल वॉर कॉलेज येथून आपले शिक्षण पूर्ण केले आहे.
जुलै १९८७ मध्ये नौदलात रुजू झालेल्या व्हाइस ॲडमिरल स्वामिनाथन यांचा नौदलातील बहुतांश कालावधी पश्चिम कमांड व कमांडशी संलग्न युद्धनौकांवर गेला आहे. त्यांनी जलद हल्ल्याच्या क्षेपणास्त्र युद्धनौका आयएनएस विद्युत, आयएनएस विनाश व आयएनएस कुलीश यांसह आयएनएस म्हैसूर ही विनाशिका व आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू युद्धनौकांचे कमांडिंग अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे.
हेही वाचा:
Nilesh Lanke : खासदार निलेश लंके पुण्यातील रुग्णालयात दाखल; हेल्थ अपडेट समोर






