BJP Politics : भाजपचा मास्टरस्ट्रोक! पक्ष संघटनेत केले मोठे फेरबदल
उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना (BJP Politics) प्रचंड वेग आला आहे. राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने आपल्या राज्य संघटनेत अत्यंत मोठे फेरबदल करत नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.

BJP Politics : उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना (BJP Politics) प्रचंड वेग आला आहे. राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने आपल्या राज्य संघटनेत अत्यंत मोठे फेरबदल करत नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी यांनी पक्षाची नवी संघटनात्मक (BJP Politics) यादी जाहीर केली असून, या नव्या रचनेतून आगामी निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने मोठी रणनीती आखल्याचे स्पष्ट होत आहे.
या नव्या कार्यकारिणीच्या घोषणेपूर्वी दिल्ली आणि लखनौमध्ये भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये कमालीचे मंथन झाले. प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी यांनी भाजपचे केंद्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याशी संघटनात्मक बदलांबाबत सविस्तर चर्चा केली होती.
या मॅरेथॉन बैठकांमध्ये पक्षाची आगामी निवडणुकांसाठीची (BJP Politics) मोर्चाबांधणी आणि तळागाळात पक्ष अधिक कसा मजबूत करता येईल, यावर सखोल रणनीती ठरवण्यात आली आणि त्यानंतरच या यादीला हायकमांडकडून मंजुरी देण्यात आली.
पक्षाने जाहीर केलेल्या नव्या रचनेत सर्वाधिक चर्चा आहे ती १९ प्रदेश उपाध्यक्षांच्या नियुक्तीची. यामध्ये भाजपने विरोधी पक्षांना खिंडार पाडत धक्का दिला आहे. समाजवादी पक्षाविरुद्ध बंड पुकारून भाजपच्या गोटात सामील झालेल्या आमदार पूजा पाल यांच्याकडे पक्षाने प्रदेश उपाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे. यासोबतच, देशाचे संरक्षण मंत्री आणि लखनौचे खासदार राजनाथ सिंह यांचे सुपुत्र नीरज सिंह यांचीही प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे.
या उपाध्यक्षांच्या यादीत सुरेश राणा, सत्यपाल सैनी, ब्रज बहादूर, डॉ. धर्मेंद्र सिंग, मोहित बेनिवाल, देवेश कोरी, प्रियांका रावत, दुर्विजय शाक्य, रमेश सिंग, अर्चना मिश्रा, शंकर गिरी, कामेश्वर सिंग, डॉ. कृतिका अग्रवाल, सुरेश मौर्य, राजेश यादव, कृष्ण बिहारी राय आणि आलोक गुप्ता अशा प्रमुख नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. या संपूर्ण यादीत ओबीसी प्रवर्गातील नेत्यांना मोठे प्राधान्य देण्यात आले आहे.
उपाध्यक्षांसोबतच पक्ष संघटनेला अधिक गती देण्यासाठी ८ महत्त्वाच्या राज्य सरचिटणीसांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये रामप्रताप सिंह चौहान, गीता शाक्य, अभिजात मिश्रा, उपेंद्र रावत, संजय राय, शंकर लोधी, दिलीप पटेल आणि राजेश चौधरी हे नेते आता पक्षाच्या मुख्य धोरणांची आणि निवडणूक नियोजनाची धुरा सांभाळतील.
याशिवाय, पंकज चौधरी यांनी आपल्या टीमचा विस्तार करत १८ नेत्यांची राज्य सचिव (मंत्री) म्हणून नियुक्ती केली आहे. या निवडीत भाजपने सामाजिक समतोल राखण्यावर विशेष भर दिला असून सर्व जाती-जमातींमधील नेत्यांना योग्य प्रतिनिधित्व दिले आहे.
यामध्ये विजय शिवहरे, बसंत त्यागी, शिवभूषण सिंग, सहजानंद राय, अंकुर शर्मा, अनिल यादव, अवधेश श्रीवास्तव, विजय राजभर आणि प्रमेंद्र जांगडा विश्वकर्मा हे नेते प्रमुख चेहरे म्हणून समोर आले आहेत.
एकंदरीत पाहता, उत्तर प्रदेश भाजपची ही नवी राज्यस्तरीय टीम थेट निवडणुकांच्या तयारीसाठी (BJP Politics) मैदानात उतरवली गेल्याचे दिसते. विरोधकांच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांना सक्रिय करणे आणि सर्व समाजाला सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाणे, हाच या संघटनात्मक उलटफेरीमागचा भाजपचा मुख्य हेतू असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.





