Mamata Banerjee: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. “मी हरलेली नाही, त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि मी राजभवनातही जाणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर तोफ डागली. भाजपने १०० जागा चोरल्याचा आरोप – (Mamata Banerjee) पत्रकार परिषदेत बोलताना ममता बॅनर्जी यांनी थेट निवडणूक आयोगावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, “आमची लढाई भाजपशी नव्हती, तर निवडणूक आयोगाशी होती. भाजपने आमच्या १०० जागा चोरल्या आहेत. ज्या पद्धतीने महाराष्ट्र, हरियाणा आणि बिहारमध्ये निवडणुका चोरल्या गेल्या, तसाच प्रकार बंगालमध्येही घडला आहे. संपूर्ण यंत्रणेवर कब्जा मिळवण्यासाठी लोकशाहीची हत्या केली गेली आहे.” ‘काउंटिंग सेंटरवर माझ्यासोबत मारहाण झाली’ – (Mamata Banerjee) Mamata Banerjee: पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जींनी जाहीर केला मोठा निर्णय; म्हणाल्या – ‘मी हरलेली नाही, राजीनामा….’ ममता बॅनर्जी यांनी अत्यंत गंभीर आरोप करताना सांगितले की, जेव्हा त्या मतमोजणी केंद्रावर गेल्या होत्या, तेव्हा त्यांच्यासोबत मारहाण करण्यात आली. “सीआरपीएफचे जवान गुंडांसारखे वागत होते. ते उमेदवारांनाही मतमोजणी केंद्रात शिरू देत नव्हते. मी मनमोहन सिंग, देवेगौडा आणि गुजराल यांची सरकारे पाहिली आहेत, पण इतका अत्याचार कधीच पाहिला नाही. तुम्हाला देश लुटायचा आहे का?” असा संतप्त सवाल त्यांनी केंद्र सरकारला विचारला. निवडणुकीच्या निकालावर ममतांचे महत्त्वाचे मुद्दे: – काल जे घडले, ते बंगालच्या इतिहासातील काळा अध्याय आहे. जर भाजप निष्पक्षपणे जिंकली असती, तर मी काहीही बोलले नसते. – न्यायपालिका स्वतंत्र नाही, निवडणूक आयोग पक्षपाती आहे. भारत सरकारला केवळ ‘एकपक्षीय राजवट’ हवी आहे. – भाजपने गुंडांच्या मदतीने बंगालमध्ये अत्याचार सुरू केले असून टीएमसीच्या महिला समर्थकांना बलात्काराच्या धमक्या दिल्या जात असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला. नव्या संघर्षाचा एल्गार – “आता मी कोणत्याही पदाविना नवी दिल्लीच्या विरोधात लढा देईन. ज्यांच्यावर अन्याय होत आहे, त्यांच्या पाठीशी माझी पार्टी खंबीरपणे उभी राहील. आम्ही पुन्हा झेप घेऊ (Bounce Back) आणि आमचा लढा सुरूच राहील,” असा निर्धार ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला.