जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, रामबनमध्ये तिघांचा मृत्यू, ४ जण बेपत्ता

Jammu Kashmir Cloudbrust | जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन आणि ढगफूटी झाल्याचे वृत्त सातत्याने समोर येत आहे. यातच आता जम्मू-काश्मीरमधील रामबनमध्ये ढगफुटी झाली असून या तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४ जण बेपत्ता झाले आहेत.
राजगड परिसरातील उंच भागात मुसळधार पाऊस आणि ढगफुटी झाल्याने अचानक पूर आला आणि त्यामध्ये काही घरे वाहून गेले आणि अनेक घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील वाहत्या पाण्यामध्ये दोन घरे आणि एका शाळेची इमारत वाहून गेली.
बेपत्ता लोकांचा शोध सुरू
मदत आणि बचाव पथके घटनास्थळी पोहोचली असून, बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. तसेच या घटनेत बाधित झालेल्या रहिवाशांना मदत करण्यासाठी देखील बचाव आणि मदत कार्य स्थानिक प्रशासनाकडून सुरू आहे. रामबन प्रशासनाच्या माहितीनुसार, एनडीआरएफ, पोलिस आणि स्थानिक पथके मदत कार्यात गुंतली आहेत. तथापि, डोंगराळ भाग आणि पावसामुळे बचाव मोहिमेत अडचणी येत आहेत. Jammu Kashmir Cloudbrust |
अनेक गावांचा संपर्क तुटला
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक नद्या पूर्णपणे भरून वाहत आहेत. येथील बारमाही मार्ग सलग पाचव्या दिवशी बंद आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला मुसळधार पाऊस आणि अचानक आलेल्या पुरामुळे उधमपूर जिल्ह्यात जखेनी आणि चेनानी दरम्यान झालेल्या भूस्खलनामुळे २,००० हून अधिक वाहने अडकली आहेत. मुसळधार पावसामुळे जम्मू, सांबा, कठुआ आणि उधमपूरमधील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
याशिवाय, उत्तराखंडमध्ये गुरुवारी ढगफुटीमुळे ५ जणांचा मृत्यू झाला तर ११ जण बेपत्ता आहेत. तसेच, हिमाचल प्रदेशातील मनाली येथे ब्यास नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नदीकाठचा भाग वाहून गेला आहे. Jammu Kashmir Cloudbrust |
हेही वाचा:





