सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सलग तिसरी चकमक ; उधमपूरमधील चकमकीत एक जवान शहीद

Udhampur Enounter । जम्मू-कश्मीरमधील पहलगाम याठिकाणी पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर आज सकाळी उधमपूर जिल्ह्यातील बसंतगड जवळ सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. या चकमकीत एक जवान शहीद झाल्याची महती समोर आली आहे. याविषयीची माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली आहे . गेल्या 24 तासात जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेली ही सलग तिसरी चकमक आहे
गेल्या दोन दिवसांपासून उधमपूरमध्ये चकमक Udhampur Enounter ।
पहलगाम,मध्ये हल्ला झाल्यापासून भारतीय सैन्य आणि जम्मू काश्मीर पोलिसांचे संयुक्त ऑपरेशन सुरू आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, उधमपूर जिल्ह्यातील दुडुपसंतगड भागात सध्या गोळीबार सुरू आहे. घनदाट जंगल आणि धोकादायक भूप्रदेशासाठी ओळखला जाणारा हा परिसर भारतीय लष्कराच्या अधिकार क्षेत्रात येतो. या भागात दोन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर शोध मोहीम सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
GOC, WhiteKnightCorps and all ranks salute braveheart Hav Jhantu Ali Shaikh of 6 PARA SF, who made the supreme sacrifice during a counter terror operation. His indomitable courage and the valour of his team will never be forgotten. We stand in solidarity with the bereaved family… pic.twitter.com/QpInGDPdXf
— ANI (@ANI) April 24, 2025
शोधपथके बेरोले भागात पोहोचतात अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला. ही चकमक उंचावरच्या प्रदेशात होत असून आजूबाजूला घनदाट जंगल आहे. या भागात असंख्य नैसर्गिक गुहा आणि लपण्याची ठिकाणे असल्याने दहशतवादी सुरक्षा दलांपासून लपण्यासाठी या भागाचा अनेकदा वापर करतात.
24 तासात सलग तिसरी चकमक Udhampur Enounter ।
सध्या सुरू असलेल्या सर्च ऑपरेशन दरम्यान सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांशी काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात गुरुवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली . चकमकीत एक जवान शहीद झाला आहे . पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या 24 तासात झालेली ही सलग तिसरी चकमक आहे .हा परिसर बसंतगडपासून चालत जवळजवळ तीन तासांच्या अंतरावर आहे .उन्हाळ्यात अनेक मेंढपाळ गुरे चरण्यासाठी ही जागा वापरतात.





