मुख्यमंत्री नितीश कुमारांचे महिलांसाठी मोठं गिफ्ट; सप्टेंबरपासून मिळणार १० हजार रुपये; काय आहे नवी योजना?

CM Nitish Kumar | बिहारमध्ये आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने विविध योजनांची घोषणा केली जात आहे. याचदरम्यान आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिलांसाठी एक मोठी योजना सुरू केली आहे. महिलांना रोजगार सुरू करण्यासाठी आर्थिक सहकार्य प्रदान करण्याच्या हेतूने एक योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजना’ ही नवीन योजना सुरू करण्यात आल्याची माहिती नितीश कुमार यांनी दिली आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले की, ‘मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेला मंजुरी मिळाली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला तिच्या आवडीचा रोजगार सुरू करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाईल. याअंतर्गत सप्टेंबरपासून 10 हजार रुपये दिले जाणार आहेत. सरकारचा विश्वास आहे की या पावलामुळे महिला केवळ स्वावलंबी होणार नाहीत, तर कुटुंबाच्या उत्पन्नात आणि राज्याच्या प्रगतीतही महत्त्वपूर्ण योगदान देतील.’
पुढे नितीश कुमार यांनी लिहिले, “नोव्हेंबर 2005 पासून आमच्या सरकारने महिला सशक्तीकरणासाठी अनेक कामे केली आहेत. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सातत्याने पावले उचलली आहेत. आज महिला कुटुंब आणि राज्याच्या प्रगतीत योगदान देत आहेत. आता आम्ही या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलत आहोत. या योजनेमुळे केवळ महिलांची आर्थिक स्थिती मजबूत होईल असे नाही, तर रोजगाराच्या संधीही वाढतील. यामुळे बिहारमधील महिला राज्यातच रोजगार मिळवतील आणि रोजगारासाठी बाहेर जाण्याची सक्ती कमी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. CM Nitish Kumar |
योजनेत काय आहे खास?
- प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला रोजगार सुरू करण्यासाठी 10 हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळेल.
- सप्टेंबर 2025 पासून ही रक्कम महिलांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केली जाईल.
- रोजगार सुरू केल्यानंतर सहा महिन्यांनी कामाचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर गरज भासल्यास महिलेला 2 लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त सहाय्य दिले जाऊ शकते.
- महिलांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी गावापासून शहरापर्यंत हाट-बाजार विकसित केले जातील.
- या योजनेची अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होईल. याची जबाबदारी ग्रामीण विकास विभागाकडे असेल आणि नगर विकास व गृहनिर्माण विभागही सहकार्य करेल. CM Nitish Kumar |
हेही वाचा :
JP Nadda : आगामी महापालिका निवडणुका; भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज पुणे दौऱ्यावर





