Farooq Abdullah Firing: जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सचे संरक्षक डॉ. फारुख अब्दुल्ला यांच्यावर एका लग्न समारंभात गोळीबार करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला, मात्र त्यातून ते थोडक्यात बचावले. हल्ल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. प्राथमिक चौकशीत आरोपीने “गेल्या २० वर्षांपासून या दिवसाची वाट पाहत होता.” अशी थेट कबुली दिली असल्याची माहिती समोर आलीय. (Farooq Abdullah Firing) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची ओळख कमल सिंग अशी झाली आहे. जो जम्मूतील पुरानी मंडी येथील रहिवासी अजित सिंगचा मुलगा आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र देखील जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे आणि पुढील तपास सुरू आहे. Kamal Singh Jamwal बुधवारी जम्मूमधील गंग्याल पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या ग्रेटर कैलाश येथील रॉयल पार्क बँक्वेट हॉलमध्ये, जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला,(Farooq Abdullah) उपमुख्यमंत्री सुरेंद्र चौधरी, कॅबिनेट मंत्री सतीश शर्मा आणि जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे राजकीय सल्लागार नासिर अस्लम हे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि ज्येष्ठ वकील दिनेश सिंग चौहान यांच्या मुलीच्या लग्नाला उपस्थित होते. अब्दुल्ला लग्न समारंभाला गेले होते. Farooq Abdullah Firing: समोर आलेल्या माहितीनुसार, डॉ. फारुख अब्दुल्ला सकाळी ९:१५ च्या सुमारास लग्न समारंभात पोहोचले आणि त्यांनी बँक्वेट हॉलमध्ये त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसह आणि नेत्यांसोबत काही वेळ घालवला. यादरम्यान, डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी उपस्थितांशी संवाद साधला. सकाळी १०:१० वाजता ते त्यांच्या घरी रवाना झाले तेव्हा त्यांच्यासोबत जम्मू आणि काश्मीरचे अनेक मंत्री आणि पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या गाडीपर्यंत पोहोचले होते. मानेवर बंदूक रोखली डॉ. फारुख अब्दुल्ला पार्किंगच्या ठिकाणी पोहोचताच, लग्नाच्या गर्दीतील एका व्यक्तीने अचानक त्यांच्याकडे येऊन त्यांच्या पाठीवर बंदूक रोखली. गोळीबार करण्यापूर्वीच एका सुरक्षा रक्षकाने त्यांच्या खांद्यावरून बंदूक काढली आणि डॉ. फारुख अब्दुल्ला थोडक्यात बचावले. २० वर्षे वाट पाहिली Farooq Abdullah Firing: जम्मू आणि काश्मीरचे कॅबिनेट मंत्री सतीश शर्मा यांनी, डॉ. फारुख अब्दुल्ला हल्ल्यातून थोडक्यात बचावले. ते डॉ. फारुख अब्दुल्ला यांना त्यांच्या गाडीजवळ सोडत असताना गर्दीतील एका व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी दावा केला की, हल्लेखोर म्हणाला की तो २० वर्षांपासून या दिवसाची वाट पाहत होता.