नगर : टाकळीभान येथे “अक्षता कलशाची शोभायात्रा

टाकळीभान – श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे ग्रामस्थ व हिंदू बांधवांच्या वतीने आज योध्या येथून आणलेल्या”अक्षता कलशाची शोभायात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली. पानाफुलांनी सजविलेल्या रथात अक्षता कलशाची शोभायात्रा काढण्यात आली होती.
यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. श्रीरामांचा जयघोष करण्यात आला. ग्रामस्थांनी या अक्षता कलशाचे स्वागत करून कलशाचे पूजन केले. या शोभायात्रेत टाकळीभानसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संखेने सहभागी झाले होते.
सुमारे ५०० वर्षांचा संघर्षानंतर योध्या नगरीत प्रभु श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर उभे राहिले असून २२ जानेवारी रोजी प्रभू श्रीरामांची मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
त्या प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण म्हणून आपल्याला अक्षता अयोध्या येथून आलेल्या आहे. त्या अक्षता कलशाची शोभायात्रा आज रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाली.





