Chitale Bandhu: ऑनलाइन मिठाई विक्रीचा बनाव
Chitale Bandhu:
Updated On:

चितळे बंधूंच्या नावाने ग्राहकांची फसवणूक
Chitale Bandhu: चितळे बंधू मिठाईवाले यांच्या नावाने ऑनलाइन मिठाईची ऑर्डर स्वीकारून ग्राहकांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
चितळे बंधूंच्या शाखेचा अधिकृत लँडलाइन क्रमांक बदलून त्या ठिकाणी सायबर चोरट्याने आपला मोबाइल क्रमांक टाकला. या क्रमांकावर संपर्क साधून ऑनलाइन ऑर्डर देणाऱ्या ग्राहकांकडून पैसे स्वीकारल्यानंतर मिठाई न देता संबंधित क्रमांक ब्लॉक करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात सायबर चोरट्यावर फसवणूक केल्याप्रकरणी तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. चितळे बंधू मिठाईवाले यांचे स्वीय सहाय्यक नितीन अभिमन्यू दळवी (३७, रा. शेवंता हाईट्स, धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे.
टॅग्स:





