China Open 2024 : कोको, सबलेन्का उपांत्यपूर्व फेरीत दाखल…

China Open 2024 : – जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या आर्यना सबलेन्काने मॅडिसन कीजचा पराभव करताना कारकिर्दीतील सलग 15 विजय मिळविला. तर दुसरीकडे जापानच्या नाओमी ओसाकाला दुसऱ्या सेटमध्ये पाठीच्या दुखापतीने डोके वर काढल्याने अमेरिकेच्या कोको गॉफ (Coco Gauff) सोबतच्या लढतीतून माघार घ्यावी लागली. आता कोको गॉफ व आर्यना सबलेन्का या दोघींनीही स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे.
सिनसिनाटी ओपन स्पर्धेचे विजेतेपद मिळविल्यानंतर बेल्जीयमच्या सबलेन्काने विजयाची मालिका सुरूच ठेवली होती. आज सबलेन्काने मॅडिसन कीजचे आव्हान 6-4,6-3 असे 63 मिनिटात मोडून काढले. दोन्ही सेटमध्ये सर्व्हिसवर सबलेन्काने वर्चस्व राखले.
सबालेन्का हिच्या समोर शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीत कॅरोलिना मुचोवाचे (Aryna Sabalenka vs Karolina Muchova) आव्हान असणार आहे. झेकियाच्या मुचोवाने स्पेनच्या क्रिस्टीना बुक्साला 6-2,6-0असे एकतर्फी पराभूत करताना उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
IND vs BAN : भारताच्या विजयाने WTC गुणतालिकेत मोठी उलथापालथ..! जाणून घ्या, पॉइंट टेबलची स्थिती…
जपानच्या नाओमी ओसाकाला अमेरिकेच्या कोको गॉफसोबतची लढत पाठीच्या दुखापतीमुळे अर्धवट सोडावी लागली आहे. यामुळे अमेरिकेच्या कोको गॉफला पुढील फेरीत स्थान मिळाले. नाओमी ओसाकाने 6-3 असा पहिला सेट जिंकला होता. मात्र दुसऱ्या सेट सुरु असताना कोकोने 4-3 अशी आघाडी घेतली होती. मात्र नाओमीने 1 गुणांची कमाई करून 4-4 अशी लढत बरोबरीत आणली. मात्र यावेळी कोकोची जोरदार फटका परतवण्याच्या प्रयत्नाने तिच्या पाठीला त्रास होण्यास सुरुवात झाली. यावेळी तिने संघाशी बोलून या लढतीतून निवृत्ती घेतली.





