मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बजावला मतदानाचा हक्क; म्हणाले “महाराष्ट्रातील जनता…”

Eknath Shinde| लोकसभा निवडणूकीच्या महाराष्ट्रातील 20 मे रोजी शेवटच्या पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे. राज्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. यात मुंबईतील सहाही मतदार संघाचा समावेश आहे. तसेच ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, पालघर आणि उत्तर महाराष्ट्रातील तीन जागांचा समावेश आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. त्यानुसार राज्यात ९ वाजेपर्यंत सरासरी ६.३३ टक्के मतदान झाले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली आहे.
नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. कल्याणमधून एकनाथ शिंदेंचे सुपुत्र श्रीकांत शिंदे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यानिमित श्रीकांत शिंदे यांचे आईने औक्षण केले. त्यानंतर एकनाथ शिंदेसह कुटुंबाने मतदानाचा हक्क बजावला. Eknath Shinde|
#WATCH | Maharashtra CM Eknath Shinde says “All the important decisions have been taken by Prime Minister Narendra Modi in the last 10 years. So I am confident that the people of Maharashtra are going to vote for Mahayuti.”#LokSabhaElections2024 pic.twitter.com/hJc1uuACym
— ANI (@ANI) May 20, 2024
”महाराष्ट्रातील जनता महायुतीला मतदान करणार’
यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षात सर्व महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता महायुतीला मतदान करणार आहे, असा मला विश्वास आहे,” असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
हेही वाचा:
लोकसभा निवडणूकीचा पाचवा टप्पा: राज्यात सकाळी ९ पर्यंत सरासरी ६.३३ टक्के मतदान





