मुंबई – गुरूपौर्णिमेला दरवर्षी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर सर्वच जण नतमस्तक होत असतात. गुरूपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात एक वेगळी भावना असते. गुरूपौर्णिमेच्यानिमित्त स्मृतिस्थळावर बाळासाहेबांना वंदन करताना एक मनामध्ये त्यांच्याबद्दल श्रद्धा आहे. त्यांच्या आशीर्वादामुळे माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता आणि शिवसैनिकाला मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमदार संजय शिरसाठ, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार यामिनी जाधव, आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि माजी नगरसेवक समाधान सरवणकर हे उपस्थित होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, बाळासाहेबांचा आशीर्वाद आणि त्यांच्या शुभेच्छा यामुळे यासर्व घडामोडी शक्य झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी जो काही विचार दिला. तो विचार पुढे नेण्याचा प्रयत्न मी आणि माझ्यासोबत जे 50 आमदार आहेत, ते आम्ही करत आहोत. बाळासाहेबांनी नेहमीच सर्व सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम केले असल्याचेही ते म्हणाले.
मुंबई महापालिका निवडणूक; शरद पवार यांचे कार्यकर्त्यांना कामाला लागाचे निर्देश…
महाराष्ट्रात मराठी माणसाला आणि हिंदुत्वाला ताठमानेने जगण्याची शिकवण त्यांनी दिली. त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने त्यांचे विचार या महाराष्ट्रात आम्ही पुढे घेऊन जात आहोत. सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम युती सरकार करेल. तसेच शेतकरी, कष्टकऱ्यांसह राज्याचा सर्वांगिण विकास हेच आमचे ध्येय आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर त्यांना वंदन केले आहे. त्यांचे आशीर्वाद घेतले असून ते माझ्या पाठिशी आहेत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
जपानचे माजी पंतप्रधान शिंझो ऍबे यांच्यावर अंत्यसंस्कार