Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा खळबळजनक गौप्यस्फोट म्हणाले; बाळासाहेब गेल्यानंतर…
शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात जोरदार सत्तासंघर्ष सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत.

Eknath Shinde : शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात जोरदार सत्तासंघर्ष सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत.
सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या बाजूने जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर शिंदे यांनी ठाकरे गटावर थेट निशाणा साधला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पक्षात अंतर्गत लोकशाही पूर्णपणे संपली होती, संघटनात्मक निवडणुका घेणे बंद झाले होते आणि पक्षात केवळ मनमानी कारभार सुरू होता, असा मोठा गौप्यस्फोट त्यांनी (Eknath Shinde) केला.
दिल्ली दौऱ्यावर असलेल्या एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेनेच्या देशभरातील राज्य प्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक घेऊन आगामी राजकीय रणनीतीवर खलबतं केली. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आणि पक्षांतर्गत परिस्थितीवर परखड भाष्य केले.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, “आज न्यायालयात शिवसेनेची बाजू मांडण्यास सुरुवात झाली आहे. बाळासाहेबांची मूळ घटना आणि त्यांचे प्रखर विचार नंतरच्या काळात कसे पायदळी तुडवले गेले, हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. सत्तेच्या मोहापायी पक्षाची घटना बदलली गेली आणि बाळासाहेबांचे विचारही बदलले गेले. एका बाजूला विचार गोठवले, जनतेचा जनादेश गोठवला आणि कडवट हिंदुत्वही गोठवले गेले. आता तर परिस्थिती अशी आहे की धनुष्यबाण हे चिन्हही गोठवण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे.”
पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठीच आम्ही पाऊल उचलले होते आणि राज्यातील जनतेने आमच्या या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे.
महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला मनापासून स्वीकारले असून त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत, असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयातील लढाईच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी केलेल्या या विधानांमुळे राजकीय वर्तुळात नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.






