BJP Leader CR Patil | गुजरात भाजपमधील नेते आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री सीआर पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात नवा वाद पेटला आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते’, असे वक्तव्य सी.आर पाटील यांनी केलं आहे. सुरतमध्ये आयोजित पाटीदार समाजाच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. ‘मला सांगताना आनंद होतोय की, छत्रपती शिवाजी महाराजही पाटीदार समाजाचे होते आणि त्यांनीही हिंदू स्वराज्याची स्थापना करण्याचे यशस्वी प्रयत्न केले’, असं पाटील म्हणाले. संजय राऊतांची टीका सीआर पाटील यांच्या या दाव्यावर महाराष्ट्रातील नेत्यांनी तीव्र शब्दात आक्षेप घेतला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधत, छत्रपती शिवाजी महाराजांना गुजराती करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू असल्याचे म्हंटले आहे. कोण आहेत सीआर पाटील? सीआर पाटील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय जलशक्ती मंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे मूळ जळगाव जिल्ह्यातील पिंपरी अकारौत येथील असून त्यांचे संपूर्ण शिक्षण आणि वास्तव्य गुजरातच्या सुरतमध्ये झाले आहे. त्यांनी सुमारे 14 वर्षे पोलीस दलात सेवा बजावली होती, मात्र शिस्तभंगाच्या कारवाईमुळे त्यांना सेवेतून बाहेर पडावे लागले होते. BJP Leader CR Patil | पाटीदार समाजाचे महत्त्व काय? पाटीदार समाज हा गुजरातमधील मोठा प्रभावशाली बहुसंख्याक समाज मानला जातो. गुजरातच्या राजकारणावर या समाजाचा मोठा प्रभाव आहे. यात जमीनधारक आणि शेती करणारा समाज असून यामध्ये लेऊवा आणि कडवा पाटीदार असे दोन मुख्य गट आहेत. गेल्या काही वर्षांत या समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी मोठे आंदोलन केले होते. मात्र सध्या राज्यात सध्या 29 महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी केलेल्या भाजप नेत्याने केलेल्या या विधानाचे राज्यातील निवडणूक प्रचारात जोरदार पडसाद उमटण्याची शक्यता आहे. BJP Leader CR Patil | हेही वाचा: Pune : लाडक्या बहिणींसह मतदार आमच्या पाठीशी ठाम; शिवसेना उमेदवारांचा विश्वास