मांजरी – प्रभाग क्रमांक १५ मधील शिवसेना उमेदवार राजश्री माने, संदीप लोणकर, सिमा घुले व निलेश घुले यांच्या प्रचारार्थ साडेसतरानळी परिसरात भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेदरम्यान उमेदवारांनी घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत मतदानाचे आवाहन केले. पदयात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला असून, विशेषतः लाडक्या बहिणी व ज्येष्ठ नागरिकांनी उमेदवारांना आशीर्वाद देत पाठिंबा दर्शविला. “लाडक्या बहिणींसह सर्व मतदार निश्चितपणे आमच्या मागे उभे राहतील,” असा ठाम विश्वास यावेळी शिवसेना उमेदवारांनी व्यक्त केला. या पदयात्रेत जेष्ठ मार्गदर्शक दिलीपआण्णा घुले यांच्यासह विशाल ढोरे, अमर घुले, सुधीर घुले, विकी माने, नवनाथ तुपे, अमित तुपे, बाळासाहेब नलावडे, अरविंद नलावडे, राहुल शिंदे, दीपक कामठे, शैलेंद्र शेलार, नयना कामठे, रिताशा घुले, प्रदीप बहीरट, संतोष माने, अनंता अहिवळे, नंदकुमार घुले, बाबासाहेब शिंगोटे, अंकुश घुले, विजय कामठे. अमित पवार, अक्षय तारू, दीपक कुलाळ, तुषार मरळ, निशिगंधा थोरात, दीपक माने, दीपक गायकवाड, छाया गदादे, योगीराज लोणकर, साहेबराव लोणकर, ॲड. कालिदास लोणकर, कैलास इंगळे, अशोक ढमढेरे, दिलीप लोणकर, रायबा गायकवाड, रामदास चांदगुडे, दत्तात्रय भंडारी यांच्यासह प्रभागातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.