Chhatrapati Sambhajiraje : वाघ्या, वाघ्या कोण वाघ्या? छत्रपती संभाजीराजे संतापले; म्हणाले… दूध का दूध और …

Waghya Statue Controversy : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीसमोर असलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी केली आहे. तेव्हापासून वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरुन वाद निर्माण झाला आहे. एकीकडे वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवण्याची मागणी होत आहे, तर दुसरीकडे त्यांच्या या मागणीला विरोध होत आहे. या विषयावर सत्य समोर आणण्यासाठी इतिहासकारांची समिती बसवा, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली आहे.
काय म्हणाले संभाजीराजे?
संभाजी राजे म्हणाले, वाघ्या, वाघ्या कोण वाघ्या? देशात एकच वाघ होऊन गेला छत्रपती शिवाजी महाराज. इतिहासात कुठेही वाघ्या कुत्र्याची नोंद नाही. तर सत्य शोधण्यासाठी इतिहासकारांची समिती बसवा. त्या वाघ्या कुत्र्याबाबत धनगर समाज, होळकर यांचा संबंध काय? असा प्रश्न छत्रपती संभाजी राजे यांनी विचारला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपाने देव पाहायला मिळाला
आपण सर्वजण राहत असलेल्या स्वराज्याची संकल्पना त्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांनी मांडली. सर्वधर्मातील लोकांना एकत्र केले, एव्हढेच नव्हे तर राज्यकारभारात लोकांचा सहभाग असावा यासाठी त्यांनी संकल्पना मांडली. खरे तर देव आपण कधी पाहिला नाही, मी तरी आजपर्यंत पाहिला नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपाने त्या काळातील लोकांना देव पाहायला मिळाला. मात्र, आज दुर्दैव आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधाने केले जातात, असे खासदार उदयनराजे भोसले म्हणाले.
पुढे म्हणाले, आज खरंच समाज एवढा विकृत झाला आहे का? आपण हा अपमान किती काळ सहन करणार? छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबाबत विशेष कायदा करण्याची मागणी केली आहे. मी याआधीच सांगितले होते की विशेष कायदा पारित करा. सर्व राजकीय पक्षांना सांगून देखील कायदा पारित केला नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनाच असे वाटते का? की अशा प्रकारे अवमान झाला पाहिजे? लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कार्यपद्धतीमधून सिद्ध करून दाखवले पाहिजे. कायदा पारित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असंही उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.





