Prakash Ambedkar : छत्रपती संभाजीराजेंवर मोक्का लावून तुरुंगात टाका; कोणी केली मागणी?

Raigad Waghya Dog Memorial : संभाजीराजे छत्रपती यांनी रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी समोरील वाघ्या कुत्र्याचे शिल्प आहे. हे शिल्प हटवण्याची मागणी केली आहे. या मागणीच्याविरोधात धनगर समाजातील काही नेत्यांनी भूमिका घेतली आहे. त्यामुळे वाघ्या शिल्पाचा वाद चिघळणार का? अशी चर्चा सुरु आहे. याची चर्चा सुरू झाली आहे. या सगळ्या घडामोडींवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्यावर मोक्का लावावा अशी मागणी त्यांनी केली आहे. ते एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलत होते. (Prakash Ambedkar)
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
प्रकाश आंबेडकर यांनी म्हणाले, संभाजी महाराजांना सरळ उचलून मोक्का लावावा. देशाच्या कायद्याच्या विरोधात भुमिका घेण्याऱ्यांचे लांगूलचालन करणे योग्य नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही हिंमत दाखवावी. राज्याने राज्य केले पाहिजे. धर्माचे राजकारण करताना जे सोईचे ते वापरतात. संभाजीराजे छत्रपती हे राजर्षी शाहूंचे पणतू आहेत म्हणून त्यांच्या विरोधात भूमिका घ्यायची नाही असे नाही. उद्या मी सुद्धा कायदा विरोधी कृत्य केले तर मला ही तुरुंगात टाकले पाहिजे, असे सांगत ही हिंमत देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावी, अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली. (Chhatrapati Sambhajiraje )
पुढे म्हणाले, ज्या भाजपचे हात मुसलमानांच्या रक्ताने माखले आहेत. त्यांच्याकडून सौगात ए मोदी स्विकारावा का हा विचार मौलवींनी करायला हवा. हेच मौलवी निवडणुकीच्या वेळी फतवे काढतात ना? मग तुमच्या 18 टक्के समाजाला नाकारणाऱ्यांकडून भेट स्विकारावा का? असा सवालही प्रकाश आंबेडकरांनी केला. (Raigad Waghya Dog Memorial)
देशातले अडीच लाख हिंदू हे परदेशी नागरिकत्व घेऊन बाहेर गेले आहेत. त्यात आताच्या आकडेवारीनुसार 22 टक्के हिंदूना देश सोडून परदेशात जावे वाटत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भाजपला आता मुसलमानांची मते हवी आहेत. त्यासाठी हे आता मुसलमानांना जवळ करू पाहत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.





