Chess Olympiad 2024 : भारतीय बुद्धिबळासाठी ही वेळ जादू सारखीच – विश्वनाथन आनंद

नवी दिल्ली – भारतीय बुद्धिबळासाठी ही वेळ जादू सारखीच आहे. खेळाडूंनी निश्चितच चांगली कामगिरी करून भारताला विजेतेपद मिळवून दिले आहे. ते सातत्याने आपल्या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करत असल्याचे भारताचा ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याने बोलताना सांगितले.
भारतीय पुरुष आणि महिला संघांनी 45 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये विजेतेपद साकारले. या विजेतेपदामध्ये भारताचा ग्रँडमास्टर असलेल्या विश्वनाथन आनंदची महत्वपूर्ण भूमिका होती. 2022 साली भारतात झालेल्या स्पर्धेत भारताने कांस्यपदकापर्यंत मजल मारली होती. त्यावेळी देखील थोडक्यात भारतीय संघाला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली होती. त्यानंतर बुडापेस्ट येथे झालेल्या स्पर्धेत खुल्या गटातून डी. गुकेश, आर प्रज्ञानंद, अर्जुन एरिगेसी, विदित गुजराती, पी. हरिकृष्णा तर महिला गटातून हरिका द्रोणवल्ली, आर. वैशाली, दिव्या देशमुख, वंतिका अग्रवाल आणि तानिया सचदेव यांनी चमकदार कामगिरी करताना भारताला विजेतेपद मिळवून दिले.
स्पर्धेपूर्वीच आनंदने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारताच्या विजेतेपदाचा विश्वास व्यक्त केला होता. सन 2020 साली आनंदने अकादमीची स्थापना केली होती. या अकादमी मध्ये गुकेश, प्रज्ञानंद, एरिगे आणि वैशाली यांनी प्रशिक्षण घेत आहेत. विशी सर यांच्यामुळेच आम्ही आज जेथे आहोत, तिथपर्यंतचा प्रवास शक्य झाला असल्याचे डी. गुकेश व प्रज्ञानंद यांनी बोलताना सांगितले.
गुकेश आणि प्रज्ञानंद यांच्या खेळातील प्रगतीने आपण आश्चर्यचकित झालो असल्याचे ग्रँडमास्टर आनंद मान्य केले होते. अकादमीमध्ये सुरुवातीच्या खेळाडूंमध्ये प्रज्ञानंद आणि गुकेश यांचा समावेश होता. त्यानंतर अर्जुन व वैशाली यांनी देखील सहभागी झाले. हे खेळाडू इतक्या झटपट प्रगती हे अविश्वसनीय आहे. हे माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने हे खेळाडू प्रगती करत आसल्याचे आनंदने बोलताना सांगितले.





