Chess Olympiad 2024 (9th Round) : महिला संघाने अमेरिकेशी व पुरुषांनी उझबेकिस्तानशी साधली बरोबरी…

45th FIDE Chess Olympiad 2024 :- भारताच्या महिला संघाने अमेरिका संघासोबत तर पुरुष संघाने उझबेकिस्तान सोबत बरोबरी करताना ४५ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील आपली आगेकूच कायम राखली. भारताची ग्रँडमास्टर असलेल्या वंतिका अग्रवालने महत्वाच्या सामान्यात ग्रँडमास्टर इरिना क्रशला पराभूत करण्याची कामगिरी बजावली.
नवव्या फेरीच्या लढतीमध्ये भारताने आजच्या लढतीमध्ये डी. हरिकाला विश्रांती दिली होती. आर. वैशालीला गुलरुखबेगम तोखिरजोनोव्हाकडून पराभव स्वीकारावा लागला. भारताच्या दिव्या देशमुखने कॅरिसा यिपसोबत तर तानिया सचदेवने एलिस ली सोबतची लढत बरोबरीत सोडविली.
IM @vantikachess saves the day for Team India – she scores a critical win against GM Irina Krush with the Black pieces, and the Indian Women’s Team hold a 2-2 draw against USA in Round 9 of the Chess Olympiad!#chess #chessbaseindia #chessolympiad pic.twitter.com/T8epRKEIOw
— ChessBase India (@ChessbaseIndia) September 20, 2024
वांतिका अग्रवालने गरजेच्या वेळी चमकदार कामगिरी करताना ग्रँडमास्टर इरिना क्रशचा पराभव केला. त्यामुळे भारताला अमेरिकेसोबत २-२ अशी बरोबरी करता आली. आजच्या बरोबरीने भारताचे १५ गुण झाले आहेत. सुवर्णपदक मिळविण्यासाठी शेवटच्या दोन फेरीत विजय मिळविणे आवश्यक आहे. महिला संघासमोर पुढील फेरीत चीन संघाचे आव्हान असणार आहे.
It is official! The defending Chess Olympiad Champions Uzbekistan 🇺🇿held India 🇮🇳 2-2! All 4 games were drawn.#FIDE100 #BudapestOlympiad pic.twitter.com/2FO49b168e
— Susan Polgar (@SusanPolgar) September 20, 2024
खुल्या गटात भारतीय पुरुष संघाने गतविजेत्या उझबेकिस्तानशी बरोबरी साधली. सलग आठ विजयानंतर नवव्या फेरीतही भारताने विजय मिळवला असता तर सुवर्णपदक निश्चित झाले असते. भारताच्या अर्जुन एरिगेसीला शमसिद्दीन वोखिडोव्हच्या चुकीचा फायदा उठवता आला नाही आणि त्याने बरोबरी साधली.
Chess Olympiad 2024 (8th Round) : भारतीय पुरुषांची विजयी मालिका कायम तर महिला संघाला पराभवाचा धक्का…
डी गुकेशने नोदिरबेक अब्दुसत्तोरोव बरोबरची तर आर प्रग्यानंदने जावोखिर सिंदारोवसोबतची लढत बरोबरीत सोडविली. विदित गुजरातीने देखील जाखोंगीर वखिडोव सोबतची लढत बरोबरीत सोडविली. पुरुष गटात भारताचे आता १७ गुण झाले असून अमेरिका, उझबेकिस्तान व चीन १५ गुणांसह संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहे.




