Chess Olympiad 2024 (8th Round) : भारतीय पुरुषांची विजयी मालिका कायम तर महिला संघाला पराभवाचा धक्का…

45th FIDE Chess Olympiad 2024 :- भारतीय पुरुष संघाने 45 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये आठव्या फेरीत विजय मिळवला, मात्र महिला संघाला पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. या स्पर्धेत आठव्या फेरीत महिला संघ प्रथमच पराभूत झाला आहे.
भारतीय पुरुष संघाने आठव्या फेरीत इराणविरुद्ध 3.5-0.5 असा शानदार विजय नोंदवून सुवर्णपदकावर आपला दावा मजबूत केला. मात्र, महिलांना पोलंडकडून 1.5-2.5 असा पराभव स्वीकारावा लागला. खुल्या गटात सलग आठव्या विजयासह, पुरुष संघाने एकूण 16 गुणांसह आपली आघाडी कायम ठेवली आहे. यजमान हंगेरी आणि उझबेकिस्तान गुणतालिकेत दोन गुणांनी मागे आहेत.
🇮🇳 India continues their dominance at the 45th #ChessOlympiad with a commanding 3.5-0.5 win over 🇮🇷 Iran in Round 8!
Gukesh, Erigaisi, and Gujrathi delivered key victories against Parham Maghsoodloo, Bardiya Daneshvar, and Pouya Idani, pushing India further ahead in the… pic.twitter.com/tIsXABHxck
— International Chess Federation (@FIDE_chess) September 19, 2024
जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या अर्जुन एरिगायसीने काळ्या मोहऱ्यांसह आक्रमक सुरुवात करत बर्डिया दानेश्वरचा पराभव केला. डी गुकेशने इराणच्या परम मगसूदलूचा पराभव केला. आर प्रज्ञानंदने अमीन तबताबेईसोबतची लढत बरोबरीत राहिली. विदित गुजराथीने इदानी पूयाला हरवून संघाच्या विजयात गुणांची भर घातली.
Chess Olympiad 2024 (7th Round) : भारतीय महिलांनी जॉर्जियाचा तर पुरुष संघाने चीनचा केला पराभव…
महिला गटात, ग्रँडमास्टर डी. हरिका आणि आर. वैशाली यांना अनुक्रमे पोलंडच्या एलेना काशालिंस्काया आणि मोनिका सोको यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. दिव्या देशमुखने अलेक्झांड्रा मालत्सेवस्काया हिला हरवून भारताला स्पर्धेत परत आणले. वांतिका अग्रवालची चांगली स्थिती असूनही ऍलिझा स्लिविकाविरुद्ध विजय नोंदवू शकली नाही. हा सामना अनिर्णित राहिल्याने संघाला स्पर्धेतील पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय महिला संघाचे 14 गुण झाले आहेत. नवव्या फेरीत भारतीय पुरुषांचा सामना उझबेकिस्तानशी तर महिला संघाचा सामना अमेरिकेशी होणार आहे.




