ChatGPT पुन्हा एकदा डाउन; लाखो युजर्सचा खोळंबा

ChatGPT Down | जगभरातील वापरकर्त्यांना चॅटजीपीटी, सोरा आणि जीपीटी एपीआय वापरण्यात अडचणी येत आहेत. काही दिवसांपूर्वीच युजर्सनी या चॅटबॉटच्या आउटेजबाबत तक्रारी नोंदवल्या होत्या. भारतासह अमेरिका, युरोप आणि आशियातील वापरकर्त्यांनी चॅटजीपीटी काम करत नसल्याबद्दल तक्रारी केल्या आहेत.
DownDetector या वेबसाइटनुसार, या बातमीपर्यंत 3,400 हून अधिक युजर्सनी ChatGPT च्या आउटेजची तक्रार नोंदवली आहे. या आउटेजमुळे ओपनएआयच्या अनेक सेवांवर परिणाम झाला आहे. चॅटजीपीटीमध्ये लॉगिन, रिस्पॉन्स आणि एपीआय अॅक्सेसमध्ये वापरकर्त्यांना समस्या येत आहेत. सोरा सारखी नवीन टूल्स देखील काम करत नाहीत. आतापर्यंत 82% युजर्सनी आउटेजची तक्रार नोंदवली आहे.
OpenAI ची प्रतिक्रिया
ChatGPT च्या आउटेजबाबत OpenAI ने आपली प्रतिक्रिया दिली आहे. कंपनीने सांगितले की, त्यांनी समस्येचे कारण शोधले असून त्यावर काम सुरू केले आहे. लवकरच ही समस्या सोडवली जाईल, असे त्यांनी सांगितले. एआय टूल्सच्या वारंवार येणाऱ्या तांत्रिक समस्या वापरकर्त्यांना चिंतेत टाकत आहेत. या महिन्यातील हा दुसरा मोठा आउटेज आहे, ज्यामुळे ओपनएआयच्या सेवा स्थिरतेबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. ChatGPT Down |
युजर्सने काय करावे?
OpenAI ने युजर्सना सल्ला दिला आहे की, जोपर्यंत ChatGPT च्या सेवा पुन्हा स्थिर होत नाहीत, तोपर्यंत युजर्सनी वारंवार लॉगिन करण्याचे टाळावे. यामुळे अकाउंटवर सिक्युरिटी लॉक होण्याची शक्यता आहे. तसेच, कंपनीने सांगितले की, या समस्येवर रिअल-टाइम अपडेट्ससाठी फक्त अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवावा. यासोबतच, युजर्सनी या कालावधीत ChatGPT वापरून डेटा स्टोअर करू नये, जेणेकरून त्यांचा डेटा डिलीट होणार नाही. ChatGPT Down |
हेही वाचा :
Kiara Advani : लक्ष्मीच्या पावलांनी….; कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ झाला बाबा





