ChatGPT आणि Gemini ला आव्हान! मेटाने लाँच केले दोन नवीन पॉवरफुल AI मॉडेल्स

Meta AI Models | सध्या सर्वत्र चॅटजीपीटी, डीपसीक, Grok या चॅटबॉट एआय मॉडेलची चर्चा आहे. या एआय चॅटबॉट मॉडेलचा मोठ्या प्रमाणात वापर देखील केला जातो. आता या एआय मॉडेल्सला टक्कर देण्यासाठी मेटा प्लॅटफॉर्मचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. कंपनीने त्यांच्या लार्ज लँग्वेज मॉडेल (LLM) ‘Llama’ अंतर्गत दोन नवीन मॉडेल सादर केले आहेत.
या मॉडेल्सचे नाव ‘Llama 4 Scout’ आणि ‘Llama 4 Maverick’ असे आहे. आगामी काळात आणखी दोन मॉडेल बाजारात आणले जाणार असल्याची माहिती मार्क झुकेरबर्ग यांनी दिली.
मार्क झुकेरबर्ग यांनी स्वतः त्यांच्या इंस्टाग्राम (Instagram) प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर करत याबद्दल माहिती दिली. व्हिडिओमध्ये त्यांनी Llama 4 च्या दोन मॉडेल्सची माहिती दिली आणि हे मॉडेल गुगलच्या जेमिनी (Gemini) आणि ओपनएआयच्या चॅटजीपीटी 4o (ChatGPT 4o) ला टक्कर देतील, असा विश्वास व्यक्त केला.
मेटाचे Llama हे एक मल्टीमॉडेल एआय (Multimodal AI) सिस्टीम आहे. हे सिस्टीम टेक्स्ट, व्हिडिओ , इमेज आणि ऑडिओ o) अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डेटावर काम करू शकते आणि या फॉरमॅटमध्ये कंटेंट रूपांतरित करण्याची क्षमता ठेवते.
मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितले की, Llama 4 Scout आणि Llama 4 Maverick हे आतापर्यंतचे सर्वात प्रगत मॉडेल आहेत. हे दोन्ही मॉडेल ओपन सोर्स सॉफ्टवेअर (Open Source Software) असतील.
आणखी नवीन मॉडेल लवकरच
कंपनी ‘Llama 4 Behemoth’ नावाचे आणखी एक मॉडेल तयार करत आहे. हेमॉडेल आतापर्यंतचा सर्वात स्मार्ट LLMs मॉडेल असेल, असा दावा केला जात आहे. तसेच, नवीन मॉडेल्स विकसित करण्यासाठीही हे मॉडेल उपयोगी ठरू शकतेय मेटा एआय साठी अनेक नवीन योजना आखत आहे. यासाठी कंपनी यावर्षी 65 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे.





