गुंड गजानन मारणेच्या हस्ते चंद्रकांत पाटलांचा सत्कार; वडेट्टीवार म्हणाले, “महायुतीला लाडके गुंड महत्वाचे”

Vijay Vadettiwar On Chandrkant Patil | दहिहंडीच्या पुण्यातील कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील आणि कुख्यात गुंड गजानन मारणे एकाच मंचावर एकत्र पाहायला मिळाले. यावेळी गजानन मारणेकडून चंद्रकांत पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरून सध्या विरोधकांकडून चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली जात आहे. याआधी पार्थ पवार, निलेश लंके यांनीही गजानन मारणेची भेट घेतली होती त्यावेळीही त्यांच्यावर मोठी टीका झाली होती.
विजय वडेट्टीवार यांचे ट्वीट
चंद्रकांत पाटील आणि गुंड गजानन मारणे यांचा सत्कारचा व्हिडिओ शेअर करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर देखील निशाणा साधला आहे. ‘लाडके गुंड‘ या नावाने त्यांनी ट्वीट केले आहे. “कुख्यात आणि महायुती सरकारचा लाडका गुंड गजानन मारणे याने मंगळवारी झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मंत्री महोदयांनी देखील पुष्पगुच्छ स्वीकारून गजानन मारणेला हात जोडले.
पुण्यातील कोथरूड भागात असलेला गजानन मारणे, त्याच कोथरुड मधील आमदार चंद्रकांत पाटील. लोकप्रतिनिधी हे जनतेसाठी असतात पण परत निवडून येण्यासाठी आजच्या परिस्थितीत महायुतीला लाडके गुंड महत्वाचे आहे म्हणून सत्कार चमत्कार गुंडाकडून घेतले जात आहे. या भागातील नागरिकांना अश्या गुंडापासून संरक्षण देणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी असताना मंत्री महोदय गुंडाला ‘राजाश्रय‘ देत आहे,” असे वडेट्टीवार यांनी म्हंटले आहे. Vijay Vadettiwar On Chandrkant Patil |
‘लाडके गुंड‘
कुख्यात आणि महायुती सरकारचा लाडका गुंड गजानन मारणे याने मंगळवारी झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मंत्री महोदयांनी देखील पुष्पगुच्छ स्वीकारून गजानन मारणेला हात जोडले.
पुण्यातील कोथरूड भागात असलेला गजानन मारणे,… pic.twitter.com/jIM7KilKSd
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) August 29, 2024
तर बुधवारी राजकोट किल्ल्यावरील नारायण राणे आणि निलेश राणे यांचे काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यावरूनही वडेट्टीवार यांनी भाष्य करत म्हंटले की, “भाजपचे माजी मंत्री आणि विद्यमान खासदार यांनी आणि त्यांच्या मुलाने पोलिसांची इज्जत कशी काढली हे काल दिवसभर संपूर्ण महाराष्ट्राने लाईव्ह पाहिले. पोलिसांना धमकावण्याचा असा माज खासदार नारायण राणे आणि त्यांचा मुलगा निलेश राणे यांना कुठून आला हा प्रश्न जनतेला पडला होता. त्याचे उत्तर मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिले आहे.” Vijay Vadettiwar On Chandrkant Patil |
पुढे ते म्हणाले, “या राज्यात पोलिसांची इज्जत राहिली नाही. मंत्री गुंडांकडून सत्कार करून घेतात, आमदार पोलिसांना शिवीगाळ करतात, धमकावतात. जिथे गुंडांना राजाश्रय मिळत आहे तिथे सामान्य जनतेने आपले रक्षण होईल या भाबड्या आशा ठेवू नये. गुंडांना डोक्यावर घेऊन मिरवणाऱ्या या सरकारला आता जनतेने पुष्पगुच्छ देऊन निरोप द्यावा हीच राज्यातील जनतेला विनंती.”
कोण आहे गजानन मारणे?
गजा मारणे पुण्यातील कुख्यात गुंड आहे. मारणे गँगचा म्होरक्या अशी त्याची ओळख आहे. तो कोथरूड भागात वास्तव्यास आहे. त्याच्यावर पुणे शहर आणि जिल्ह्यात मिळून 24 गंभीर गुन्हे दाखल आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यांसह बेकायदा शस्त्र बाळगणे अशा गुन्ह्यांत त्याचा सहभाग आहे. त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई झाली आहे. त्याचे विविध पक्षांच्या नेत्यांसोबत संबंध असल्याचे देखील म्हंटले जाते.
हेही वाचा:
“फक्त १०० दिवस बाकी”; ‘पुष्पा २’च्या नवीन पोस्टरसह महत्त्वाची अपडेट समोर





