Pushpa 2 Release Date| साऊथ स्टार अल्लू अर्जुनचा बहुप्रतीक्षित ‘पुष्पा 2′ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. यादरम्यान चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. नुकतेच निर्मात्यांनी चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर केले आहे. ज्याद्वारे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
नवीन पोस्टरमध्ये, अल्लू अर्जुन पुष्पा राजच्या अवतारात पाहायला मिळत आहे.’ पुष्पा २’ च्या नवीन पोस्टरसह टॅगलाइन लिहिली आहे, ‘१०० दिवसांत रूल पाहा’. म्हणजेच हा चित्रपट आजपासून १०० दिवसांनी थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘#Pushpa2TheRule साठी १०० दिवस बाकी, बॉक्स ऑफिसच्या प्रतिष्ठित अनुभवासाठी तयार रहा. ६ डिसेंबर २०२४ रोजी थिएटरवर राज्य करण्यासाठी सज्ज.’ मैत्री मुव्ही मेकर्सच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्टर कॅप्शनसह अपलोड केले गेले आहे. . Pushpa 2 Release Date|
View this post on Instagram
दरम्यान, ‘पुष्पा 2: द रूल’ हा चित्रपट 15 ऑगस्टला रिलीज होणार होता. मात्र या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर आता डिसेंबर महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज होणार असल्याचे नव्या पोस्टरवरून स्पष्ट होत आहे. सुकुमार यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘पुष्पा: द राइज’ या 2021 मध्ये आलेल्या सिनेमाने धुमाकूळ घातला होता. आता याचा दुसरा भाग ‘पुष्पा : द रुल’ही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. Pushpa 2 Release Date|
या चित्रपटाचे ‘मेरा सामी’ हे गाणे प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीत येत असून हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंडिंगवर आहे. सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा 2’ चित्रपटात अल्लू अर्जुन व्यतिरिक्त, रश्मिका मंदान्ना यात श्रीवल्लीच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी पुन्हा सज्ज झाली आहे.
हेही वाचा:
शरद पवार तातडीने दिल्लीला रवाना; गृह खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची घेणार भेट