नगर | कृषी फलोद्यानच्या अध्यक्षपदी चंद्रकांत लामखडे

निघोज, (वार्ताहर)- शेतकऱ्यांना पाठबळ देण्याचा विचार करून निघोज कृषी फलोद्यान सहकारी संस्था स्थापन करणाऱ्या बाबासाहेब कवाद यांच्या विचारांचे अनुकरण करीत संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत लामखडे, उपाध्यक्ष अमृता रसाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी संस्थेचा नावलौकिक जिल्ह्यात केला असल्याचे प्रतिपादन बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद यांनी व्यक्त केले आहे.
निघोज परिसर कृषी फलोद्यान सहकारी संस्थेची अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी राजेश चाबुकस्वार सभेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी चंद्रकांत लामखडे यांची अध्यक्षपदी तसेच उपाध्यक्षपदी अमृता रसाळ यांची बिनविरोध फेरनिवड झाल्याबद्दल त्यांचा कन्हैया दूध उद्योग समूहाचे अध्यक्ष शांताराम लंके , बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद, उपाध्यक्ष नामदेवराव थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष नामदेव थोरात, श्री पांडुरंग पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत लंके, उपाध्यक्ष दत्तात्रय गुंड, निघोज सोसायटीचे अध्यक्ष सुनिल वराळ, उपाध्यक्ष शांताराम लाळगे, वसंत ढवण, रामदास वरखडे, पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय लंके, भास्करराव कवाद, खंडू लामखडे, शांताराम कळसकर, विश्वस्त विश्वासराव शेटे, ठकाराम लंके आदींसह अधिकारी व कर्मचारी तसेच सभासद उपस्थित होते.





