Nagar | वसंतराव नाईक पुरस्कार मिळाल्याबद्दल रसाळ यांचा सत्कार

निघोज, (वार्ताहर) – आजची युवा पिढी शेतीकडे आकर्षित झाली पाहिजे, यासाठी प्रगतशील शेतकरी राहुल रसाळ यांचे दहा वर्षांतील योगदान फार मोठे आहे. राज्य सरकारने वेळोवेळी दखल घेऊन रसाळ यांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याची दखल घेतल्याचे प्रतिपादन मुलिकादेवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सहदेव आहेर यांनी केले.
मुलिकादेवी महाविद्यालय निघोज येथे आदर्श शेतकरी राहुल रसाळ यांना महाराष्ट्र शासनाने 2024 चा वसंतराव नाईक नाविन्यपूर्ण शेतकरी पुरस्कार दिला आहे. याबद्दल महाविद्यालयाच्यावतीने रसाळ यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.सहदेव आहेर होते.
डॉ. प्रविण जाधव, डॉ. दुर्गा रायकर, डॉ. पोपट पठारे, डॉ. गोविंद देशमुख, प्रा. मनीषा गाडीलकर, प्रा.संगीता मांडगे, प्रा.आनंद पाटेकर, प्रा.स्वाती मोरे, प्रा. सचिन निघूट, प्रा.नीलिमा घुले, प्रा.रुपाली गोरडे, प्रा.पूनम गंधाक्ते, प्रा. नूतन गायकवाड, प्रा. वृषाली जगदाळे, प्रा.अपेक्षा लामखडे, प्रा. अश्विनी सुपेकर, प्रा. अमृता दौंडकर, प्रा.नम्रता थोरात, प्रा. अशोक कवडे, प्रा. अक्षय अडसूळ, प्रा.संदीप लंके, नवनाथ घोगरे, अक्षय घेमुड, किशोर बाबर उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.आनंद पाटेकर यांनी तर आभार डॉ. मनोहर एरंडे यांनी मांडले.





