Nagar | रांजणखळगे परिसरात ग्रामअभियान ग्रामस्वच्छता

निघोज (वार्ताहर) – जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरात मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टच्या माध्यमातून रविवारी सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत ग्रामअभियान ग्रामस्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे सल्लागार रुपेश ढवण यांनी दिली.
यावेळी उपकार्याध्यक्ष वसंत कवाद , विश्वस्त शंकरराव लामखडे, रमेश ढवळे, रोहिदास लामखडे, ॲड. ज्ञानेश्वर लामखडे, सल्लागार मंडळाचे सदस्य दिलीप लाळगे, गंगाराम वराळ, राजेंद्र ढवळे, नवनाथ लाळगे, मणिकर्णिका ज्वेलर्सच्या संचालिका शुभांगी लामखडे, ट्रस्टचे व्यवस्थापक महेश ढवळे, राजू वराळ आदी उपस्थित होते.
प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते आठ वाजता जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरात ग्रामअभियान ग्रामस्वच्छता करण्याचा निर्णय ट्रस्टच्या वतीने घेण्यात आला आहे.
गेली दहा ते पंधरा वर्षांपासून या जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरात मोठ्या प्रमाणात शासकीय निधीतून तसेच ग्रामस्थ , मुंबईकर मंडळ व भाविक यांच्या लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत.
या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक सातत्याने येत असतात. तसेच राज्यातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या माता मळगंगा देवीचे मंदिर गावकरी व भाविक यांनी लोकसहभागातून बांधले असून हा परिसर निसर्गरम्य होण्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू आहेत.
प्रत्येक रविवारी होणाऱ्या ग्रामअभियान ग्रामस्वच्छता अभियान सेवाभावी संस्था, ग्रामस्थ, सहकारी संस्था यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





