Nagar | राज्यस्तरीय स्पर्धेत सरस्वती महिला बचत गट प्रथम

निघोज, (वार्ताहर) – बायफ संस्थेच्या ५८ व्या वर्धापन दिनाच्या निमिताने वडनेर बु येथील सरस्वती महिला बचत गटाने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये राज्यभरातून अनेक गटांनी सहभाग नोंदवला होता.
शेवटपर्यंत स्पर्धेत टिकून वडनेर बु, येथील सरस्वती महिला बचत गटाने राज्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवून वडनेर बु . चे नाव पुन्हा एकदा राज्यात झळकावले आहे . त्यामुळे या गटाचे सर्वत्र कौतुक होत आहे. नाशिक येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
गटातील महिला स्वाती नऱ्हे, समाबाई चौधरी, रंभा नऱ्हे , लंका थोरात, मंदाबाई वाजे, ललिता नऱ्हे, नंदा नऱ्हे , सोनल नऱ्हे, ललिता वाजे, चंद्रभागा चौधरी , शारदा नऱ्हे आदींनी सहभाग घेतला होता.
यावेळी ज्योती भिटे व बायफ टिम यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रादेशिक संचालक डॉ रविराज जाधव , कार्यकारी अधिकारी एस. एम . वागळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप खोसे, प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन अधिकारी डॉ बी . आर.नरवडे , श्रीकृष्ण गांगुर्डे तसेच मुकूल बाविस्कर उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आले.





