Bribe Case : ८ लाखांची लाच घेताना केंद्रीय जीएसटीचा अधीक्षक लोकायुक्तच्या जाळ्यात
Bribe Case : बेंगळुरू शहर लोकायुक्तच्या एका विशेष पथकाने अत्यंत नियोजनबद्ध कारवाई करत सेंट्रल जीएसटीच्या एका सुपरिंटेंडंटला तब्बल ८ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.

Bribe Case : बेंगळुरू शहर लोकायुक्तच्या एका विशेष पथकाने अत्यंत नियोजनबद्ध कारवाई करत सेंट्रल जीएसटीच्या एका सुपरिंटेंडंटला तब्बल ८ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. (Bribe Case)
आरोपी अधिकाऱ्याची ओळख मोहित प्रताप सिंह अशी पटली असून, ते साउथ कमिश्नरेटच्या साउथ डिव्हिजन-४ मध्ये सेंट्रल जीएसटी सुपरिंटेंडंट म्हणून कार्यरत आहेत. जीएसटीची थकबाकी आणि एका व्यापाऱ्याविरुद्ध दाखल खोटी तक्रार बंद करण्याच्या मोबदल्यात ही लाच मागितली होती. (Bribe Case)
लोकायुक्त पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार समीर जमीर या व्यापाऱ्याविरुद्ध सेंट्रल जीएसटीच्या थकबाकीबाबत एक तक्रार दाखल करण्यात आली होती. ही खोटी तक्रार बंद करण्यासाठी आणि प्रकरण मिटवण्यासाठी मोहित प्रताप सिंह यांनी ८ लाखांच्या लाचेची मागणी केली होती. (Bribe Case)
या त्रासाला कंटाळून व्यापारी जमीर यांनी थेट लोकायुक्त पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीची खात्री पटल्यानंतर लोकायुक्त पथकाने सापळा रचून शेख या मध्यस्थाच्या मार्फत पैसे स्वीकारताना आरोपीला रंगेहाथ पकडले. (Bribe Case)





