Bribe Case : अजब प्रकार! व्यवसायाच्या NOC साठी मागितली चक्क ‘चांदीची अंगठी’; स्वच्छता निरीक्षक ACB च्या जाळ्यात
Bribe Case : रोख रकमेऐवजी १,२०० रुपये किमतीची नवीन खड्याची चांदीची अंगठी लाच म्हणून मागणाऱ्या कुडाळ नगरपंचायतीच्या स्वच्छता निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे.

Bribe Case : व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला ना-हरकत दाखला (NOC) देण्यासाठी तब्बल १,२०० रुपये किमतीची चांदीची अंगठी लाच म्हणून मागणाऱ्या कुडाळ नगरपंचायतीच्या स्वच्छता निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. पांडुरंग वासुदेव नाटेकर (वय ४२, रा. सावंतवाडी) असे कारवाई करण्यात आलेल्या लोकसेवकाचे नाव आहे. (Bribe Case)
NOC देण्यासाठी चक्क अंगठीची मागणी
तक्रारदाराला कुडाळ नगरपंचायत हद्दीत ‘पदमगड ज्वेलर्स’ नावाने व्यवसाय सुरू करायचा होता. त्यासाठी ना-हरकत दाखला मिळावा म्हणून त्यांनी ६ जुलै २०२६ रोजी नगरपंचायतीकडे अर्ज केला होता. (Bribe Case)
यानंतर २७ ऑगस्ट रोजी NOC घेण्यासाठी तक्रारदार नगरपंचायत कार्यालयात गेले. त्यावेळी स्वच्छता निरीक्षक पांडुरंग नाटेकर यांनी दाखला देण्यासाठी मोबदल्यात १,२०० रुपये किमतीची नवीन खड्याची चांदीची अंगठी लाच म्हणून मागितल्याचा आरोप आहे. (Bribe Case)
तक्रारदाराने थेट ACBकडे धाव घेतली
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने याबाबत सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर २७ ऑगस्ट रोजी ACBच्या पथकाने पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली. या पडताळणीदरम्यान नाटेकर यांनी स्वतःसाठी चांदीची अंगठी लाच म्हणून मागितल्याचे निष्पन्न झाल्याचे ACBने सांगितले. (Bribe Case)
अखेर सापळा रचून रंगेहाथ पकडले
यानंतर ४ सप्टेंबर २०२६ रोजी ACBच्या पथकाने कुडाळ नगरपंचायत कार्यालयात सापळा रचला. तक्रारदाराकडून १,२०० रुपये किमतीची चांदीची अंगठी स्वीकारताना पांडुरंग नाटेकर यांना रंगेहाथ पकडण्यात आले. (Bribe Case)
अंगठी लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न?
कारवाईची चाहूल लागताच नाटेकर यांनी अंगठी लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यांच्या हाताच्या बोटांवर अँथ्रासिन पावडरचे चिन्ह आढळून आले. त्यानंतर त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई आणि तपास ACBकडून सुरू आहे. (Bribe Case)
पोलीस उपअधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ACBच्या पथकाने केली. NOC देण्यासाठी रोख रकमेऐवजी चक्क चांदीची अंगठी लाच म्हणून मागितल्याच्या या प्रकारामुळे कुडाळ नगरपंचायतीच्या परिसरात चर्चेला उधाण आले आहे. (Bribe Case)
Bribe Case : 500 रुपयेही लाच घेऊ नका म्हणणारा IPS अधिकारी 1 कोटींच्या लाचप्रकरणी अडकला





