“सेलिब्रेशन हे फक्त माझ्या एकटीचे नाही, तर…”; छाया कदम यांनी कुटुंबासह मित्र-मैत्रिणींसोबत साजरा केला आनंद

Chhaya Kadam | मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने छाया कदम यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अलिकडेच त्यांना 70व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात ‘सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री’ हा मानाचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार त्यांना किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ या चित्रपटातील ‘मंजू माई’ या प्रभावी भूमिकेसाठी मिळाला. याशिवाय त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नुकतेच छाया कदम यांनी गेट-टू-गेदर पार्टीचे फोटो शेअर करत पोस्टमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दिवाळी आणि ‘फिल्मफेअरचा ब्लॅक लेडी’ पुरस्कार मिळाल्या निमित्त एकत्र येत छाया कदम यांनी सांगितले की, “काहीतरी चांगल्या निमित्ताने फॅमिली गेट टू गेदर करण्याचे खूप दिवसांपासून सगळ्यांच्या मनात सुरूच होते. पण योग म्हणा की वेळ काही जुळून येत नव्हते. पण यावेळी ती संधी मिळाली. दिवाळी आणि फिल्मफेअरच्या काळ्या बाहुली निमित्त सगळ्यांनी एकत्र येऊन गेट टू गेदर करायचे ठरवले. त्यात घरातली तर सगळी माणसे तर होतीच, पण त्या सोबत आज पर्यंतच्या माझ्या वाईट काळात मित्र म्हणून सोबत असलेली आणि आज माझं कुटूंब झालेली सगळी जीवाभावाची माणसे ही होती. Chhaya Kadam |
View this post on Instagram
खरं तर गेट टू गेदर म्हणून एकत्र आलेले सगळे पाहता पाहता कधी सेलिब्रेशन मोड मध्ये गेले हे कळलेच नाही. पण त्यामुळे एक गोष्ट भारी झाली, खूप काळानंतर सगळ्यांना असं एकत्र दिलखुलास नाचताना पाहिले. आपल्या सुख दुःखात असणारी माणसं आपल्या आनंदातही तितक्याच आपलेपणाने उभी असतात हे कमाल असते. आणि गेट टू गेदर चे झालेले सेलिब्रेशन हे फक्त माझ्या एकटीचे नाही तर ते माझ्या सोबत असणाऱ्या आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचे आहे,” असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. Chhaya Kadam |
छाया कदम यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’मधील त्यांच्या ‘मंजू माई’ या भूमिकेचे खूप कौतुक झाले. तसेच, कुणाल खेमू दिग्दर्शित ‘मडगाव एक्स्प्रेस’ या चित्रपटातही त्यांची भूमिका लक्षवेधी ठरली. याव्यतिरिक्त, पायल कपाडिया यांच्या ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाईट’ या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ग्रँड प्रिक्स पुरस्कार मिळाला. छाया कदम यांच्या या सन्मानाने मराठी कलाविश्वात आनंदाची लाट उसळली आहे. त्यांच्या अभिनयाने पुन्हा एकदा सिद्ध केलं की मेहनत आणि प्रामाणिकपणा कधीच वाया जात नाही.
हेही वाचा :
मंचावर आले अन् खुर्चीवर बसताच…; बिहारमध्ये प्रचारसभेसाठी आलेल्या मुख्यमंत्री फडणवीसांबाबत काय घडलं?





