Cape Verde History : फुटबॉल विश्वात मोठी खळबळ! अवघ्या ५ लाख लोकसंख्येच्या ‘केप व्हर्डे’ देशाने रचला इतिहास; थेट बाद फेरीत मारली धडक
Cape Verde History : केप व्हर्डे (Cape Verde) या छोट्याशा देशाने सौदी अरेबियाविरुद्ध ०-० असा ऐतिहासिक ड्रॉ खेळून विश्वचषकाच्या नॉकआऊट फेरीत प्रवेश केला आहे.

Cape Verde Qualify FIFA World Cup 2026 Knockout Round : फिफा फुटबॉल विश्वचषक २०२६ च्या मंचावर एका अशा ऐतिहासिक परीकथेची नोंद झाली आहे, ज्याने जगभरातील क्रीडाप्रेमींची मने जिंकली आहेत. आफ्रिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेल्या आणि अवघ्या ५ लाख लोकसंख्या असलेल्या केप व्हर्डे (Cape Verde) या छोट्याशा देशाने सौदी अरेबियाविरुद्ध ०-० असा ऐतिहासिक ड्रॉ खेळून विश्वचषकाच्या नॉकआऊट फेरीत प्रवेश केला आहे. यासह केप व्हर्डे फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासात बाद फेरीसाठी पात्र ठरणारा जगातील सर्वात लहान देश बनला आहे. (Cape Verde History)
स्पेन-उरुग्वेच्या ग्रुपमध्ये अजेय राहिला ‘ब्लू शार्क’ – (Cape Verde History)
आपला पहिलावहिला फिफा विश्वचषक (FIFA World Cup )खेळणाऱ्या केप व्हर्डेच्या संघाला स्पर्धेतील सर्वात कठीण ग्रुपमध्ये स्थान मिळाले होते. मात्र, या अंडरडॉग संघाने एकही सामना न गमावता अजेय राहून नॉकआऊटचे तिकीट पक्के केले.
पहिल्या सामन्यात त्यांनी २०१० च्या विश्वविजेत्या स्पेनला ०-० वर रोखून खळबळ उडवली होती. दुसऱ्या सामन्यात दोन वेळच्या चॅम्पियन उरुग्वेविरुद्ध २-२ अशी रोमांचक बरोबरी साधली. आता सौदी अरेबियाला ०-० वर रोखत ३ गुणांसह त्यांनी ग्रुपमध्ये दुसरे स्थान पटकावले.
When God is with you who will be against you?
Congratulations to Cape Verde on your qualification to round 32 of the world cup. pic.twitter.com/Tr2QaHFE9k
— Zadok Yohanna fan🇳🇬 (@Zadok_yoha) June 27, 2026
४० वर्षांचा गोलकीपर वोजिन्हा बनला ‘संकटमोचक’! (Cape Verde History)
केप व्हर्डेच्या या ऐतिहासिक यशाचा खरा महानायक ठरला तो त्यांचा ४० वर्षांचा अनुभवी गोलकीपर वोजिन्हा. सौदी अरेबियाविरुद्धच्या सामन्यात वोजिन्हाने तीन असे अद्भूत बचाव केले, ज्याने सौदीच्या खेळाडूंना चकित केले. त्याने मोहम्मद कन्नोचा हेडर आणि अब्दुल्ला अल-हमदानचा ९२ व्या मिनिटाला मारलेला अचूक शॉट रोखून संघाचा नॉकआऊटमधील प्रवेश निश्चित केला. या जादुई कामगिरीमुळे वोजिन्हाची सोशल मीडियावर प्रचंड क्रेझ निर्माण झाली असून, इन्स्टाग्रामवर त्याचे फॉलोअर्स १६ मिलियनच्या पार गेले आहेत.
आता थेट वर्ल्ड चॅम्पियन अर्जेंटिनाशी भिडणार – (Cape Verde History)
नॉकआऊटच्या (Round of 32) महामुकाबल्यात आता केप व्हर्डेसमोर जगातील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. ३ जुलै रोजी मियामीच्या मैदानावर त्यांचा सामना थेट विद्यमान विश्वविजेत्या अर्जेंटिनाशी होणार आहे. या सामन्यात आणखी एक मोठा उलटफेर करून टॉप-१६ मध्ये जागा मिळवण्याचा केप व्हर्डेचा प्रयत्न असेल.





