South Africa History : दक्षिण आफ्रिकेने रचला इतिहास! दक्षिण कोरियाला लोळवत पहिल्यांदाच गाठली फिफा विश्वचषकाची बाद फेरी
South Africa History : दक्षिण आफ्रिकेने फिफा विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच बाद फेरीत प्रवेश मिळवून नवा इतिहास रचला आहे.

South Africa vs South Korea 1-0 FIFA World Cup 2026 : फिफा फुटबॉल विश्वचषक २०२६ स्पर्धेत ग्रुप ‘ए’ मधील एका अत्यंत चुरशीच्या आणि ऐतिहासिक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बलाढ्य दक्षिण कोरियाचा १-० असा पराभव केला आहे. या सनसनाटी विजयासह दक्षिण आफ्रिकेने फिफा विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच बाद फेरीत प्रवेश मिळवून नवा इतिहास रचला आहे. या ऐतिहासिक विजयाचा महानायक ठरला तो आफ्रिकेचा २२ वर्षीय युवा स्ट्रायकर थापेलो मासेको , ज्याने सामन्यातील एकमेव आणि निर्णायक गोल डागला.
पहिल्या हाफमध्ये अटीतटीची लढत; सोन ह्युंग-मिनचा डाव उलटला –
सामन्याच्या सुरुवातीपासूनच दक्षिण आफ्रिकेने आक्रमक धोरण स्वीकारत दक्षिण कोरियाच्या बचावफळीवर दबाव आणला. मासेको, एव्हिडन्स मकगोपा आणि थालेंटे म्बाथा यांनी गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले, परंतु कोरियाचा गोलकीपर किम स्युंगग्यु याने अप्रतिम बचाव करत आफ्रिकेचे प्रयत्न हाणून पाडले. त्यामुळे पहिला हाफ ०-० असा बरोबरीत सुटला.
दुसऱ्या हाफमध्ये दक्षिण कोरियाचे प्रशिक्षक हांग म्युंग-बो यांनी रणनीती बदलत आपला स्टार खेळाडू सोन ह्युंग-मिन याच्यासह तीन मोठे बदल केले. मात्र, कोरियाचा हा डाव त्यांच्यावरच उलटला.
South Africa advance to the knockout stage for the first time! 👏#FIFAWorldCup
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) June 25, 2026
६३ व्या मिनिटाला मासेकोचा तो जादुई गोल आणि इतिहास-
History for South Africa! 🇿🇦
They’ve qualified for the knockout stage of the @FIFAWorldCup for the first time ever 👏 pic.twitter.com/4ixYpesdLu
— FIFA (@FIFAcom) June 25, 2026
सामन्याच्या ६३ व्या मिनिटाला तेशपांग मोरेमीने डाव्या बाजूने अप्रतिम धाव घेत पेनल्टी बॉक्सच्या जवळ एक अचूक पास दिला. या पासचा अचूक फायदा उठवत थापेलो मासेकोने चेंडूवर नियंत्रण मिळवले आणि आपल्या डाव्या पायाने एक सनसनाटी शॉट मारत चेंडू थेट गोल पोस्टमध्ये धाडला.
🇿🇦 Celebrations in full flow in the dressing room.
South Africa players and staff soaking it all in after a historic night.
This is what it means – togetherness, belief and making history.
That’s how you do it. #FIFAWorldCup2026 #BafanaPride #WorldCupwithMicky pic.twitter.com/37eSePVm2m
— Micky Jnr (@MickyJnr__) June 25, 2026
या गोलसह मासेको (वयाची २२ वर्षे २२५ दिवस) विश्वचषक इतिहासात दक्षिण आफ्रिकेकडून गोल करणारा दुसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. यानंतर कोरियाने बरोबरीसाठी सर्व शक्ती पणाला लावली, पण आफ्रिकेची भिंत त्यांना भेदता आली नाही. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने ३ सामन्यांत ४ गुणांसह ग्रुप ‘ए’ मध्ये दुसरे स्थान पटकावत बाद फेरीचे तिकीट पक्के केले.
विजयानंतर भावूक झालेल्या मासेकोने सांगितले की, “हा अनुभव एखाद्या स्वप्नासारखा आहे. हा विजय आम्हांला पाठिंबा देणाऱ्या आणि आमच्यावर अविश्वास दाखवणाऱ्या अशा दोन्ही चाहत्यांना समर्पित आहे. आम्ही सिद्ध केले की आम्ही सक्षम आहोत.”





